Share Market | शेअर बाजाराच्या चढ-उतारांशी मैत्री कशी करावी?

Share Market Investment in Marathi | समजा, तुमचा म्युच्युअल फंड (किंवा स्टॉक) पोर्टफोलिओ आज २ लाख रुपयाचा आहे आणि शेअर बाजारात दररोज १% ची घसरण होत आहे.

याचा अर्थ, तुम्हाला दरदिवस २,००० रुपयाचा तोटा होत आहे.

दररोज होणारा हा लॉस पाहून तुम्ही घाबरता, मनात विचार येतो की “आता सगळ विकून बाहेर पडतो. नंतर पुन्हा इन्वेस्ट करेन”

पण जरा विचार करा.

फक्त २ लाखाच्या पोर्टफोलियोमध्ये १% घसरण झाली तर एवढी भीती वाटत आहे. पुढे काही वर्षानी तुमचा पोर्टफोलियो २० लाखाचा झाला तर? तेव्हा काय होईल?

  • २० लाखावर १% घसरण = २०,००० रुपये दिवसाचा लॉस
  • २० लाखावर २% घसरण = ४०,००० रुपये दिवसाचा लॉस

म्हणून शेअर बाजाराच्या घसरणीला घाबरण्याऐवजी, आत्ताच शेअर बाजाराच्या स्वभावाची सवय लावा. छोट्या पोर्टफोलिओवर जर तुम्ही अशी भीती दाखवाल, तर पुढे जावून मोठ्या पोर्टफोलिओला मॅनेज करणे अशक्य होईल.

शेअर बाजाराचा”नैसर्गिक गुण” स्वीकारा

शेअर बाजार हा अस्थिरतेचा बाजार आहे. दररोज १-२% चढ-उतार हा त्याचा नैसर्गिक गुणधर्म आहे.

  • छोटी घसरण = नवीन गुंतवणूकीसाठी संधी.
  • मोठी घसरण = दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी “डिस्काउंट सेल”.

उदाहरण:

  • २० लाख रुपयांच्या पोर्टफोलिओवर ५% घसरण = १ लाख रुपये तोटा.
  • पण, २००८ किंवा २०२० सारख्या मंदी नंतर बाजार ५०% वर चढला आहे! म्हणून, तात्पुरते होणारे तोटे हे कायमस्वरूपी नसतात.

“रिस्क टॉलरन्स” वाढवण्याची सवय करा

गुंतवणुकीच्या यशासाठी मानसिक तयारी महत्त्वाची आहे.

  • चक्रवाढ व्याजाची शक्ती लक्षात घ्या: २० लाख रुपये १२% वार्षिक दराने १० वर्षांत ६२ लाख होतात!
  • दररोजच्या उतार-चढांकडे दुर्लक्ष करा: गुंतवणूक ही “मॅरेथॉन” आहे, “स्प्रिंट” नाही.
  • पोर्टफोलिओ तपासण्याची वारंवारता कमी करा: फोन काढला. पोर्टफोलियो चेक केला. फोन काढला. पोर्टफोलियो चेक केला. ( हे बंद करा)

गुंतवणुकीचे नियम ठरवा आणि त्यावर टिकून रहा

  • फक्त “रिस्क मनी” इन्व्हेस्ट करा: ज्या पैशाची गरज ५+ वर्षांत नाही, तेवढेच पैसे शेअर बाजारात इन्वेस्ट करा.
  • SIP सुरू ठेवा: घसरणीत SIP वाढवल्यास भविष्यात मोठा फायदा मिळतो.
  • विविधीकरण करा: फक्त इक्विटीवर अवलंबून न राहता, डेट फंड, गोल्ड ETF मध्येही गुंतवणूक करा.

तुमच्या भीतीचे मूळ कारण शोधा

जर २ लाख रुपयांच्या पोर्टफोलिओवरील २,००० रुपये तोटा तुम्हाला झोप उडवत असेल, तर याची कारणे शोधा:

  • मी खूप जास्त रिस्क घेतली आहे का?
  • माझ्याकडे पुरेसा इमर्जन्सी फंड आहे का?
  • माझ गुंतवणूक लक्ष्य निश्चित आहेत का?

योग्य कारणे समजल्यास, भीतीवर मात करणे सोपे होईल.

निष्कर्ष: “सवय” हीच तुमची सर्वात मोठी गुंतवणूक

शेअर बाजारातील चढ-उतार हे “परीक्षा” नसून, सरावाचा भाग आहे.

आज २ लाख रुपयांच्या पोर्टफोलिओवर जर तुम्ही संयम आणि धैर्य दाखवलंत, तर उद्या २० लाख किंवा २ कोटी रुपयांच्या पोर्टफोलिओवर तुमची मानसिकता आपोआप “अडजस्ट” होईल.

लक्षात ठेवा: शेअर बाजाराच्या स्वभावाशी लढण्याऐवजी, त्याच्याशी मैत्री करा! गुंतवणूक प्रवास खूप सोपा होईल.

पोस्ट वाचा: Share Market Crash | शेअर मार्केटमध्ये खरा लॉस कधी होतो?

Author

  • Marathi Finance म्हणजे मराठी लोकांसाठी आर्थिक माहितीसाठी एक सोपं आणि विश्वासार्ह प्लॅटफॉर्म. आमचं ध्येय अगदी स्पष्ट आहे – गुंतवणूक, बचत, कर्ज, विमा, शेअर बाजार आणि पैशांशी संबंधित इतर महत्त्वाच्या गोष्टींची माहिती अगदी सोप्या भाषेत देणं. आर्थिक गोष्टी समजून घ्या, मजबूत निर्णय घ्या – हाच आमचा हेतू. Marathi Finance च्या माध्यमातून आम्ही मराठी वाचकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि जागरूक बनवण्याचा प्रयत्न करतो.✌

    View all posts

Leave a Comment