Varun Beverages Q4 Results in Marathi | वरुण बेव्हरेजेस पेप्सी सारख्या मोठ्या ब्रॅंडसची बॉटल बनवायच काम करते. डिसेंबर २०२४ तिमाहीत वरुण बेव्हरेजेसचा महसूल (Revenue) ३,८१७.६१ कोटी रुपये झाला. हा गेल्या वर्षीच्या त्याच तिमाहीपेक्षा ३९.७८% जास्त आहे.
निव्वळ नफा (Net Profit) ४०.२% वाढून १८५.१४ कोटी रुपये झाला. गेल्या वर्षी हा १३१.९७ कोटी होता.
या तिमाहीत EBITDA ५८० कोटी होता, जो गेल्या वर्षीपेक्षा ३९% वाढ. पण EBITDA मार्जिन (टक्केवारी) १५.७% वरच स्थिर राहिलं.
EBITDA म्हणजे Earnings Before Interest, Taxes, Depreciation, and Amortization हा एक महत्त्वाचा फायनान्शियल टर्म आहे. EBITDA म्हणजे कंपनीचा ऑपरेशनल प्रॉफिट (व्याज, कर, Depreciation आणि इतर खर्च वजा करण्याआधीचा नफा).
शेअर मार्केटची प्रतिक्रिया
Q4 निकाल जाहीर झाल्यानंतर वरुण बेव्हरेजेसचा शेअर प्राइस २.४७% घसरून ₹५४० एनएसईवर पोहोचला.
असं का झालं?
कारण बऱ्याचदा नफा वाढल्यावरही गुंतवणूकदार “प्रॉफिट बुकिंग” (नफा काढून घेणे) करतात, किंवा त्यांना अपेक्षा पूर्ण झाल्या नसतात.
पण दीर्घकाळात कंपनीची वाढ चांगली आहे.
लाभांश (Dividend) जाहीर!
कंपनीच्या बोर्डने प्रति शेअर ₹०.५० लाभांश देण्याचा प्रस्ताव मांडला आहे.
हा शेअरधारकांच्या मंजुरीनंतरच अमलात येईल. “रेकॉर्ड डेट” (ज्या दिवशी शेअरधारक लाभांशासाठी पात्र असतात) अद्याप जाहीर झालेला नाही.
विस्तार करायच्या तयारीत
वरुण बेव्हरेजेस पेप्सिकोची सर्वात मोठी फ्रँचायझी (लायसेंसधारक) आहे. यावर्षी त्यांनी आफ्रिकेमध्ये मोठा पाऊल टाकलं:
- नवीन बाजार: दक्षिण आफ्रिका, नामिबिया, बोत्सवाना, मोझांबिक, मादागास्कर आणि कॉंगो या देशांमध्ये व्यवसाय सुरू केला.
- घडामोडी: टांझानिया आणि घानामध्ये पेप्सिकोच्या व्यवसायाची खरेदी करण्यासाठी करार केला.
- नवीन फॅक्टरी: महाराष्ट्रात सुपा, UP मध्ये गोरखपूर, ओडिशात खोर्धा येथे नवीन युनिट्स सुरू केल्या.
पैसा उभा केला (QIP)
कंपनीने ₹७,५०० कोटी क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट (QIP) द्वारे उभे केले.
QIP म्हणजे मोठ्या गुंतवणूकदारांकडून (म्युच्युअल फंड, इन्शुरन्स कंपन्या) पैसे गोळा करण्याची पद्धत.
चेअरमनचं म्हणणं काय?
रवी जैपुरिया (चेअरमन) म्हणाले, “भारतात व्हॉल्यूम (विक्री) ११.४% आणि ग्लोबल विक्री २३.२% वाढली.
आफ्रिकेत पहिल्याच वर्षात १२.५% वाढ मिळाली.
आम्ही आता मॉडर्न ट्रेड (मल्टीप्लेक्स, सुपरमार्केट) ऐवजी जनरल ट्रेड (लहान दुकाने) वर फोकस करत आहोत.
भविष्यात काय?
वरुण बेव्हरेजेसची ग्रोथ सध्या जोरात आहे.
आफ्रिकन मार्केट, नवीन फॅक्टरी आणि पेप्सिकोच्या ब्रँडचा फायदा यामुळे पुढील वर्षांतही कंपनीचं प्रदर्शन चांगलं राहण्याची शक्यता आहे.
पण शेअर मार्केटमध्ये उतार-चढाव असतोच, म्हणून गुंतवणूक करताना संपूर्ण रिसर्च करा!
पोस्ट वाचा: Ajax Engineering IPO | अजॅक्स इंजिनियरिंग आयपीओची सगळी माहिती
पोस्ट वाचा: Hexaware Technologies IPO | हेक्सावेअर टेक्नॉलॉजीज आयपीओची सर्व माहिती!
पोस्ट वाचा: Bull & Bear Market | बुल आणि बेअर मार्केट म्हणजे काय? यामधील संधी आणि धोके?