Bonus Issue Information in Marathi: Bonus Issue म्हणजे कंपनीने आपल्या विद्यमान शेअरधारकांना मोफत शेअर्स देणे. हे शेअर्स कंपनीच्या नफ्यातून दिले जातात आणि त्यासाठी तुम्हाला काही पैसे द्यावे लागत नाहीत. कंपनी डिव्हिडंडऐवजी असे बोनस शेअर्स देऊ शकते.
कंपनी Bonus Issue का देते?
जेव्हा कंपनीकडे चांगला नफा असतो पण ती तो रोख स्वरूपात शेअरधारकांना देऊ इच्छित नाही, तेव्हा ती बोनस शेअर्स देऊन नफा वाटते. यामुळे कंपनीच्या शेअरची किंमत कमी होते आणि अधिक लोक ते शेअर खरेदी करू शकतात.
Bonus Issue मुळे काय बदल होतो?
Bonus Issue मुळे तुमच्याकडे असलेल्या शेअर्सची संख्या वाढते, पण तुमच्या एकूण गुंतवणुकीची किंमत तशीच राहते. म्हणजेच शेअर्स जरी वाढले, तरी त्यांच्या किंमतीत घट होते आणि गुंतवणुकीच एकूण मूल्य समान राहते.
एक सोप उदाहरण घेऊ
समजा रोहितकडे एका कंपनीचे १०० शेअर्स आहेत, प्रत्येक ₹१० च्या दराने.
➡️ एकूण गुंतवणूक = १०० × ₹१० = ₹१०००
कंपनीने २:१ बोनस जाहीर केला म्हणजे प्रत्येक १ शेअरवर २ बोनस शेअर्स.
➡️ बोनस मिळणारे शेअर्स = १०० × २ = २००
➡️ एकूण शेअर्स = १०० + २०० = ३०० शेअर्स
आता नवीन शेअरची किंमत होईल ₹३.३३ (₹१००० ÷ ३००).
➡️ एकूण गुंतवणूक अजूनही ₹१०००च राहील.
Bonus Issue चे फायदे
- तुमच्याकडे शेअर्सची संख्या वाढते
- शेअरची किंमत कमी होते, त्यामुळे खरेदी-विक्री सुलभ होते
- दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी फायदेशीर ठरू शकते
निष्कर्ष
Bonus Issue म्हणजे कंपनी financially मजबूत आहे याचा संकेत असतो. यात थेट पैसे मिळत नाहीत, पण शेअर्स वाढल्यामुळे तुमच्या गुंतवणुकीला दीर्घकाळात चांगला फायदा होऊ शकतो.
जर तुमच्याकडे शेअर्स असतील आणि कंपनी Bonus Issue जाहीर करत असेल, तर काळजी करू नका– तुमच्याकडे फक्त आता अधिक शेअर्स असतील, गुंतवणूक मात्र जशीच्या तशीच राहील.
ही पोस्ट वाचा: Diversification: विविधीकरण म्हणजे काय? का गरजेच आहे?