Large Cap Mutual Fund म्हणजे काय? सोप्या शब्दात समजून घ्या!

Large Cap Mutual Fund in Marathi | Mutual Fund च्या माध्यमातून शेअर बाजारात गुंतवणूक करताना योग्य Mutual Fund निवडणे गुंतागुंतीचे असू शकते. अस करताना योग्य कंपन्या, चांगले फंड मॅनेजर्स आणि चांगला रिटर्न देणारा फंड शोधणे महत्त्वाचे आहे.

हे करताना एक महत्त्वाचा घटक म्हणजे कंपनीचे बाजार भांडवल (Market Capitalization). हे बाजार भांडवल कंपनीच्या गुंतवणुकीचे धोके आणि फायदे ठरवते. सेबीने Mutual Funds ना या बाजार भांडवलानुसार लार्ज कॅप, मिड-कॅप, स्मॉल-कॅप अशा प्रकारांमध्ये वर्गीकृत केले आहे. आज आपण Large Cap Mutual Funds बद्दल सोप्या भाषेत जाणून घेऊ.

Large Cap Mutual Fund म्हणजे काय?

Large Cap Mutual Fund हे इक्विटी म्युच्युअल फंड्सचा एक प्रकार आहे. या फंड्समध्ये बाजार भांडवलाने टॉप १०० अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली जाते. या कंपन्या मोठ्या, स्थिर आणि दीर्घकाळापासून चांगला नफा देणाऱ्या असतात. त्यामुळे या फंड्समधून नियमित लाभांश (Dividend) आणि दीर्घकाळात भांडवली नफा मिळू शकतो. SEBI नुसार, बाजार भांडवलानुसार टॉप १०० कंपन्यांना “लार्ज कॅप” मानले जाते.

Large Cap Mutual Fund ची वैशिष्ट्ये:

१. कमी धोका, स्थिर परतावा:
लार्ज कॅप कंपन्या स्थिर आणि विश्वासार्ह असल्यामुळे बाजारातील चढ-उतार यांचा त्यांच्या किंमतीवर कमी परिणाम होतो. मिड-कॅप किंवा स्मॉल-कॅप फंड्सपेक्षा यातील धोका कमी असतो, पण रिटर्नही कमी असू शकतो.

२. दीर्घकालीन गुंतवणूक:
शेअर बाजारात घसरण झाली तरी लार्ज कॅप कंपन्या लवकर सावरतात. ७ वर्षांपेक्षा जास्त काळ गुंतवणूक केल्यास सरासरी १०-१२% रिटर्न मिळण्याची शक्यता असते. म्हणून, हे फंड्स दीर्घकालीन ध्येयासाठी (उदा. रिटायरमेंटसाठी बचत) योग्य आहेत.

३. आर्थिक ध्येयाशी जोड:
जर तुमचे ध्येय सुरक्षिततेसह इक्विटीमधून नफा मिळवणे असेल, तर Large Cap Mutual Fund योग्य ठरतील.

Large Cap Mutual Fund मध्ये गुंतवणूक कशी करावी?

  • कोणत्याही म्युच्युअल फंड कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर किंवा Groww, Zerodha Coin किंवा Asset Plus सारख्या ऍपद्वारे ऑनलाइन गुंतवू शकता.
  • KYC प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, फक्त काही क्लिक्समध्ये गुंतवणूक शक्य आहे.
  • किंवा जवळच्या बँकमध्ये जावून अशा फंड्समधे पैसे गुंतवू शकता. (पण बँकमधून पैसे गुंतवताना जरा सावध रहा. नको ते फंडस् देतात. मी स्वतः बँकमध्ये काम करतो म्हणून सांगतोय)

Large Cap Mutual Fund चे फायदे:

  • कमी धोका: मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक असल्याने शेअर बाजारची रिस्क बऱ्यापैकी कमी असते.
  • बँक FD पेक्षा जास्त रिटर्न: सरासरी १०-१२% रिटर्न मिळू शकतो जो बँक डिपॉझिटपेक्षा चांगला आहे.
  • विविधीकरण: वेगवेगळ्या कंपन्यांच्या स्टॉक्समध्ये गुंतवल्याने पोर्टफोलिओ स्थिर ठेवण्यास मदत होते.

Large Cap Mutual Fund वरील टॅक्स:

  • कॅपिटल गेन टॅक्स: गुंतवणुकीचा कालावधी १ वर्षापेक्षा कमी असेल त्या नफ्यावर १५% टॅक्स लावला जातो. आणि १ वर्षांपेक्षा जास्त कालावधीत नफा असल्यास, १०% टॅक्स (१ लाखापेक्षा जास्त नफा असल्यास).
  • लाभांश टॅक्स: लाभांशावर (Dividend) टॅक्स आकारला जातो.
  • पण हा टॅक्स तेव्हाच लागतो जेव्हा तुम्ही Mutual Fund युनिट्स विकता म्हणजे त्यांचं रूपांतर पैशात करता. Mutual Fund मधून पैसे काढले नाही तर टॅक्स लागत नाही.

निष्कर्ष:

Large Cap Mutual Fund हे सुरक्षिततेसह इक्विटीमधून नफा मिळविण्याचा एक उत्तम मार्ग आहे. दीर्घकाळात स्थिर रिटर्न अपेक्षित असल्यास, Large Cap Mutual Fund विचारात घेऊ शकता. गुंतवणूक करताना नेहमी आपली आर्थिक गरज आणि रिस्क सहनशक्ती लक्षात घ्या.

Social Media Links

FAQs

१. लार्ज कॅप फंड्समध्ये गुंतवणूक कोण करू शकतो? ज्यांना कमी जोखीम आणि स्थिर परतावा हवा आहे, ते गुंतवणूकदार यासाठी योग्य.

२. लार्ज कॅप फंड्स धोकादायक आहेत का? मिड-कॅप किंवा स्मॉल-कॅप फंड्सपेक्षा कमी धोका, पण इक्विटी मार्केटशी जोडलेले असल्यामुळे काही जोखीम असतेच.

३. किमान गुंतवणूक कालावधी किती? किमान ३-५ वर्षे गुंतवणूक करणे चांगले.

Author

  • Marathi Finance म्हणजे मराठी लोकांसाठी आर्थिक माहितीसाठी एक सोपं आणि विश्वासार्ह प्लॅटफॉर्म. आमचं ध्येय अगदी स्पष्ट आहे – गुंतवणूक, बचत, कर्ज, विमा, शेअर बाजार आणि पैशांशी संबंधित इतर महत्त्वाच्या गोष्टींची माहिती अगदी सोप्या भाषेत देणं. आर्थिक गोष्टी समजून घ्या, मजबूत निर्णय घ्या – हाच आमचा हेतू. Marathi Finance च्या माध्यमातून आम्ही मराठी वाचकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि जागरूक बनवण्याचा प्रयत्न करतो.✌

    View all posts

Leave a Comment