Mutual Fund Investment | 32 वर्षांत ₹2,000 च्या SIP वर ₹2.62 कोटी – कोणता आहे हा फंड?

SBI Large and Mid-Cap Fund | स्थिरता आणि वाढ यांचा मिश्रण असलेला म्युच्युअल फंड शोधत आहात?

SBI Large and Mid-Cap Fund हा लार्ज-कॅप आणि मिड-कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणारा फंड आहे, जो Long Term गुंतवणूक करणाऱ्यांसाठी लोकप्रिय आहे.

३२ वर्षांचा (२८ फेब्रुवारी १९९३ ला सुरू) इतिहास असलेल्या या फंडने लॉन्चपासून १३.३३% CAGR Return दिला आहे.

चला, या फंडची वैशिष्ट्ये, फायदे आणि परफॉर्मन्स समजून घेऊ. Mutual Fund Investment

Large and Mid-Cap Fund म्हणजे काय?

हे फंड दोन प्रकारच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात:

  • Large-Cap: शेअर बाजारातील मोठ्या कंपन्या (टॉप १०० कंपन्या) ज्यामध्ये स्थिरता असते.
  • Mid-Cap: मध्यम आकाराच्या वाढीच्या कंपन्या (रँक १०१–२५०). ज्यामध्ये जास्त वाढीची शक्यता असते.
    दोन्हीचे मिश्रण करून, हा फंड रिस्क आणि रिवॉर्ड बॅलेंस करतो.

Large and Mid-Cap Fund मध्ये गुंतवणुकीचे फायदे

१. Diversification: लार्ज-कॅपची सुरक्षितता + मिड-कॅपची वाढ मिळते.
२. सातत्यशीर रिटर्न: Long Term मध्ये संपत्ती निर्माण करण्यासाठी (उदा., ३२ वर्षांत ₹२,०००/महिना SIP ₹२.६२ कोटी झाली).
३. व्यावसायिक व्यवस्थापन: फंड मॅनेजर Saurabh Pant (२०१६ पासून) सारख्या तज्ञांकडे पोर्टफोलिओची देखभाल आहे.
४. Flexibility: SIP किंवा Lumpsum आधा दोन्ही पद्धतीने तुम्ही पैसे गुंतवू शकता.

SBI Large and Mid-Cap Fund चा परफॉर्मन्स

  • लॉन्चपासून: ₹१ लाख १९९३ मध्ये गुंतवल्यास आज ~₹५४.८४ लाख (१३.३३% CAGR).
  • SIP रिटर्न: १९९३ पासून ₹2,०००/महिना → ₹२.६२ कोटी (१५.७१% CAGR).
  • अलीकडील कामगिरी:
  • ५ वर्षात: १९.१५% CAGR (बेंचमार्क २०.७५%).
  • ३ वर्षात: १५.५५% CAGR (बेंचमार्क १६.७७%).
  • १ वर्षात: ११.७५%
  • AUM: ₹२८,६८१ कोटी (जानेवारी २०२५ पर्यंत), गुंतवणूकदारांचा विश्वास दर्शविते.

SBI Large and Mid-Cap Fund मध्ये गुंतवणूक कशी कराल?

१. ऑनलाइन: SBI Mutual Fund वेबसाइट, Groww, Zerodha Coin, Paytm Money सारखे Investing Apps वापरा.
२. ऑफलाइन: SBI शाखा किंवा तुमच्या फायनान्शियल एडवायझरला संपर्क करा. (एडवायझर चा सल्ला हवा असेल तर तुम्ही मला देखील कॉनटॅक्ट करू शकता. मी एक AMFI Registered Advisor आहे)

निष्कर्ष

SBI Large and MidCap Fund हा Long Term मध्ये स्थिर वाढ इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी योग्य पर्याय आहे.

३२ वर्षांचा इतिहास, एक्सपर्ट मॅनेजमेंट आणि SIP रिटर्न यामुळे हा फंड विश्वासार्ह आहे.

पण लक्षात ठेवा: शेअर मार्केट म्हटल की रिस्क आलीच, म्हणून तुमच्या फायनान्शियल गोल आणि रिस्क सहनशक्ती विचारात घ्या.

कॉम्पाऊंडिंगचा फायदा घेण्यासाठी संयमाने गुंतवणूक करा!

पोस्ट वाचा: Mutual Fund Investment | म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना 4 महत्त्वाच्या चुका टाळा!

Social Media Links

Author

  • Marathi Finance म्हणजे मराठी लोकांसाठी आर्थिक माहितीसाठी एक सोपं आणि विश्वासार्ह प्लॅटफॉर्म. आमचं ध्येय अगदी स्पष्ट आहे – गुंतवणूक, बचत, कर्ज, विमा, शेअर बाजार आणि पैशांशी संबंधित इतर महत्त्वाच्या गोष्टींची माहिती अगदी सोप्या भाषेत देणं. आर्थिक गोष्टी समजून घ्या, मजबूत निर्णय घ्या – हाच आमचा हेतू. Marathi Finance च्या माध्यमातून आम्ही मराठी वाचकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि जागरूक बनवण्याचा प्रयत्न करतो.✌

    View all posts

Leave a Comment