Mutual Fund Portfolio Review in Marathi: गेल्या आठवड्यापासून मला खूप फॉलोवरचे DM आलेत. जॉबमुले मला पटकन रीप्लाय करता नाही येत आहे. किंवा संगळ्यांशी कॉलवर बोलण कठीण होत आहे. तरीही जेव्हा शक्य होईल तेव्हा मी कॉलवर बोलत आहे.
एका फॉलोवरने तिचा पोर्टफोलियो माझ्यासोबत शेअर केला. आपण त्यावर चर्चा करणार आहोत. तसेच काही म्यूचुअल फंड पोर्टफोलियोमध्ये काही बदल केले पाहिजेत का हे जाणून घेणार आहोत. जेणेकरून आपल्या संगळ्याना काही न काही शिकता येईल.

पोर्टफोलियोमध्ये असलेले फंड्स पुढीलप्रमाणे:
- Parag Parikh Flexi Cap Fund
- DSP Healthcare Fund
- ICICI Prudential Technology Fund
- Mirae Asset Large & Midcap Fund
- Kotak Focused Equity Fund
आता आपण या म्यूचुअल फंडसना जरा डीटेलमध्ये समजून घेऊ.
1) Parag Parikh Flexi Cap Fund: नावावरून समजतं की हा एक फलेक्सि कॅप म्यूचुअल फंड आहे. फलेक्सि कॅप म्यूचुअल फंडम्हणजे असा फंड जो मार्केटमधील विविध प्रकारच्या कंपन्यांमध्ये पैसे इन्व्हेस्ट करतो जसं की लार्ज कॅप कंपन्या, मिडकॅप कंपन्या आणि स्मॉल कॅप कंपन्या. फलेक्सि कॅप म्यूचुअल फंडमध्ये फंड मॅनेजरकडे पूर्ण सूट असते की तो पैसे कुठे गुंतवतोय. जेव्हा मार्केट पडतं तेव्हा त्याच्याकडे संधी असते की तो स्वस्त भावात चांगले स्टॉक्स विकत घेऊ शकतो तेही विविध मार्केट कॅपमधील विविध कंपन्यांमध्ये.
2) DSP Healthcare Fund: हा एक हेल्थकेअर फंड आहे. म्हणजेच हा एक सेक्टर फंड आहे. सहसा मी पोर्टफोलिओमध्ये सेक्टर फंड घेऊ नका असं सांगतो. तुम्ही सेक्टर फंडमध्ये पैसे इन्व्हेस्ट करण्याच्या आधी जर लक्ष दिलेत तर अशा फंडमध्ये फक्त आणि फक्त फार्मा किंवा हेल्थकेअर सेक्टरमधील कंपन्या असतात जसं की Sun Pharma, Cipla, Gland Pharma इत्यादी. Covid नंतर फार्मा कंपन्या किंवा औषध बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. म्हणून या सेक्टरमधील फंड हे गुंतवणूकदारांना खूप प्रभावित करतात. पण एकाच सेक्टरमध्ये सगळे पैसे गुंतवले जातात त्यामुळे रिस्क मोठ्या प्रमाणात वाढते.
3) ICICI Prudential Technology Fund: हा तिच्या पोर्टफोलियोमधील तिसरा फंड आहे. हा सुद्धा एक सेक्टर फंड आहे आणि हा आयटी सेक्टरमधील फंड आहे. याचा अर्थ या फंडमध्ये फक्त आणि फक्त टेक्नॉलॉजी क्षेत्रातील कंपन्या आहेत जसे की Infosys, TCS, Bharti Airtel इत्यादी. आता सेक्टर फंड काय वाईट नसतात पण जेव्हा त्या ठराविक सेक्टरमध्ये काही बदल होतात तेव्हा या फंडमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ किंवा नुकसान होतं. जर तुम्हाला सेक्टर फंडमधील रिस्क समजत असेल तर तुम्ही नक्की या फंडमध्ये इन्व्हेस्ट करा. नाहीतर लांबच रहा आणि तुमच्या पोर्टफोलियोला यापासून लांब ठेवा.
4) Mirae Asset Large & Midcap Fund: चौथा फंड आहे Mirae Asset Large & Midcap Fund. मी या फंडमध्ये काही बदल करण्याची गरज आहे असे सांगणार नाही. कारण हा फंड मार्केटमधील लार्ज कॅप कंपन्या म्हणजेच टॉप 100 कंपन्या तसेच मिडकॅप कंपन्यांमध्ये म्हणजेच मार्केटमधील 101 – 150 कंपन्यांमध्ये पैसे इन्वेस्ट करतो. या फंडमध्ये फारसा बदल करायची गरज नाही.
5) Kotak Focused Equity Fund: पाचवा फंड आहे Kotak Focused Equity Fund. आता हा फोकस्ड नक्की काय प्रकार आहे. फोकस्ड फंड म्हणजे या फंडमध्ये फंड मॅनेजर जास्तीत जास्त फक्त 30 कंपन्यांमध्ये पैसे इन्व्हेस्ट करतो. हा फंड चालू ठेवावा पुढे जाऊन चांगला रिटर्न देत नसेल तर यातून बाहेर पडाव नाहीतर हा फंड कंटिन्यू करावा.
या फॉलोवरने म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ मध्ये काय बदल केला पाहिजे?
उत्तर खूप सिम्पल आहे. जर सेक्टर फंड एवढी रिस्क घ्यायची आहे तर तिने एखादा स्मॉल कॅप फंड किंवा मिडकॅप फंड किंवा दोन्ही फंडस तिच्या पोर्टफोलिओ मध्ये ऍड करावे. आता कोणते फंड घ्यायचे तर Motilal Oswal Mid Cap Fund हा एक चांगला फंड आहे त्यासोबतच स्मॉल कॅप कॅटेगरीमध्ये Bank of India Small Cap Fund हा फंड कन्सिडर करू शकता.
तिचा नवीन पोर्टफोलियो असा असेल
- Parag Parikh Flexi Cap Fund (Rs 3000)
- Mirae Asset Large & Midcap Fund (Rs 2000)
- Kotak Focused Equity Fund (Rs 2000)
- Motilal Oswal Midcap Fund (Rs 1000)
- Bank of India Small Cap Fund (Rs 1000)
ही पोस्ट वाचा: ELSS फंड म्हणजे काय? | What is ELSS Fund in Marathi?
नमस्कार मित्रांनो,
माझं नाव साजन भुवड आहे, आणि मी एक AMFI नोंदणीकृत म्युच्युअल फंड सल्लागार आहे. गेल्या 4 वर्षांपासून @marathifinance या इनस्टाग्राम पेजच्या माध्यमातून, फायनान्स विषयांची माहिती सोप्या मराठीत देत आलो आहे.
जर तुम्हाला वैयक्तिक म्युच्युअल फंड सल्लागार हवा असेल, तरच माझ्याशी संपर्क साधा.
मी तुम्हाला मदत करू शकतो:
- तुमचा म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ डिझाईन करण्यात,
- त्याचा नियमितपणे रिव्यू घेण्यात, आणि
- वेळोवेळी बदल सुचवण्यात
म्यूचुअल फंड गुंतवणूक हा एक लाँग-टर्म प्रवास आहे. अस नाही की आज केल आणि काम झाल. तुम्हाला उत्तम रिटर्न्स मिळवायचे असतील तर आजच जॉइन करा आणि तुमच्यासाठी खास तयार केलेला रेडिमेड पोर्टफोलिओ मिळवा. (9372334632)
Disclaimer: म्युच्युअल फंड गुंतवणुकीत बाजारातील जोखीम समाविष्ट आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित योजनांची माहिती काळजीपूर्वक वाचावी. यामध्ये योजनांचे उद्दिष्ट, जोखीम घटक आणि खर्च यांचा समावेश आहे. म्युच्युअल फंडाचे भूतकाळातील कामगिरी भविष्यातील हमी देत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी स्वतःच्या वित्तीय उद्दिष्टांनुसार आणि सल्लागाराच्या मार्गदर्शनाने निर्णय घ्यावा. हे आर्टिकल फक्त सामान्य माहितीसाठी आहे. गुंतवणुकीचा सल्ला नाही. कोणत्याही नुकसानीसाठी लेखक जबाबदार राहणार नाही.