ELSS Fund in Marathi | इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम (ELSS) हा SEBI च्या नियमनाखालील म्युच्युअल फंड प्रकार आहे. ELSS फंड मुख्यतः इक्विटी आणि इक्विटीशी संबंधित साधनांमध्ये गुंतवणूक करतो.
हा फंड आयकर कायद्याच्या (Income Tax) कलम 80C अंतर्गत कर सवलतीसाठी पात्र आहे, ज्यामध्ये एका आर्थिक वर्षासाठी ₹1.5 लाखांपर्यंत गुंतवणुकीस सूट मिळते.
थोडक्यात काय तर तुम्ही टॅक्स बेनिफिट घेऊ शकता. ELSS साठी किमान लॉक-इन कालावधी 3 वर्षांचा असतो. (पण इथे एक महत्वाची गोष्ट समजून घेण्याची गरज आहे)
३ वर्षाचा लॉक इन पीरियड (म्हणजे फक्त ३ वर्ष नाही)
जेव्हा पण तुम्हाला कोणी बोलत की ELSS फंडमध्ये ३ वर्षाचा लॉक इन पीरियड असतो.
तर तो लॉक इन पीरियड फक्त ३ वर्ष म्हणजे म्यूचुअल फंडमध्ये प्रत्येक युनिट्सला असतो.
समजा तुम्ही १,००० ची SIP सुरू केली १ जानेवारी २०२४ ला. तर पुढीलप्रमाणे ३ वर्षाचा लॉक इन पीरियड पूर्ण होईल.
SIP रक्कम | गुंतवणूक तारीख | लॉक-इन संपण्याची तारीख |
---|---|---|
1000 | 1 जानेवारी 2025 | 1 जानेवारी 2028 |
1000 | 1 फेब्रुवारी 2025 | 1 फेब्रुवारी 2028 |
1000 | 1 मार्च 2025 | 1 मार्च 2028 |
1000 | 1 एप्रिल 2025 | 1 एप्रिल 2028 |
1000 | 1 मे 2025 | 1 मे 2028 |
1000 | 1 जून 2025 | 1 जून 2028 |
1000 | 1 जुलै 2025 | 1 जुलै 2028 |
1000 | 1 ऑगस्ट 2025 | 1 ऑगस्ट 2028 |
1000 | 1 सप्टेंबर 2025 | 1 सप्टेंबर 2028 |
1000 | 1 ऑक्टोबर 2025 | 1 ऑक्टोबर 2028 |
1000 | 1 नोव्हेंबर 2025 | 1 नोव्हेंबर 2028 |
1000 | 1 डिसेंबर 2025 | 1 डिसेंबर 2028 |
याचा अर्थ, तुम्हाला संपूर्ण रक्कम एकाच वेळी काढता येणार नाही. प्रत्येक SIP चे युनिट तीन वर्षांनी मॅच्युअर होईल. मगच तुम्ही ते पैसे काढू शकता.
ELSS Fund चे फायदे
1) टॅक्स बेनिफिट: ELSS मध्ये गुंतवणूक केल्याने ₹1.5 लाखांपर्यंत टॅक्स लागणारी इन्कम कमी करता येते. म्हणजे टॅक्स बेनिफिट मिळतो.
2) जास्त रिटर्नची शक्यता: इक्विटी-आधारित असल्यामुळे लॉन्ग टर्म गुंतवणुकीसाठी चांगले रिटर्न मिळवण्याची शक्यता असते.
3) सर्वात कमी लॉक-इन पीरियड: ELSS चा लॉक-इन कालावधी 3 वर्षांचा असतो, जो PPF (Public Providend Fund 15 वर्षे) किंवा NSC (National Saving Certificate 5 वर्षे) यांसारख्या पर्यायांपेक्षा कमी आहे.
4) संपत्ती निर्माण: करबचतीसोबतच दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्याचा संधी देते.
ELSS Fund चे तोटे
1) शेअर मार्केटमधील रिस्क: ELSS फंडचा रिटर्न शेअर मार्केटच्या कामगिरीवर अवलंबून असतो, जो निश्चित नसतो शॉर्ट टर्ममध्ये. पण लॉन्ग टर्ममध्ये चांगले रिटर्न नक्कीच मिळतात.
2) अस्थिरता: इक्विटी म्हणजेच शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणे म्हणजे शॉर्ट टर्ममध्ये चढ-उतारांना सामोरे जावे लागते.
3) लवकर पैसे काढता येत नाहीत: 3 वर्षांपर्यंत फंड लॉक केले जातात. आणि जस मी आधीच सांगितल की प्रत्येक म्यूचुअल फंड युनिट्स ३ वर्षासाठी लॉक होतो. एमर्जन्सि परिस्थितीतही पैसे काढता येत नाहीत.
ELSS Fund मध्ये कोणी गुंतवणूक करावी?
- मध्यम ते हाय रिस्क घेण्याची क्षमता असलेले व्यक्ती.
- टॅक्स बचतीसोबत संपत्ती निर्माण करण्याची इच्छा असलेले तरुण गुंतवणूकदार.
- लॉन्ग टर्ममध्ये पैशाची वाढ आणि टॅक्सची बचत करण्याची आवश्यकता असलेल्या गुंतवणूकदारांसाठी उपयुक्त.
निष्कर्ष
ELSS फंड टॅक्स बचतीसह संपत्ती वाढवण्यासाठी चांगला पर्याय आहे, पण त्याचा रिटर्न शेअर मार्केटच्या स्थितीवर अवलंबून असतो.
लॉन्ग टर्म दृष्टिकोन आणि शॉर्ट टर्ममधील अस्थिरता सहन करण्याची क्षमता असलेल्या गुंतवणूकदारांसाठी हा बेस्ट आहे.
गुंतवणूक करण्यापूर्वी स्वतःचे आर्थिक उद्दिष्ट आणि रिस्क क्षमता समजून घेणे महत्त्वाचे आहे.
(आणि हो, SIP साठी कोणता फंड निवडायचा? याबद्दल काही शंका असेल किंवा योग्य मार्गदर्शन हव असेल तर मला WhatsApp करा)
पोस्ट वाचा: फ्लेक्सी- कॅप फंड म्हणजे काय? | What is Flexi Cap Fund in Marathi?