SEBI ने NFO मधील फंड डिप्लॉयमेंटसाठी केला नवा नियम जाहीर – 1 एप्रिल 2025 पासून लागू

SEBI sets 30-day deadline for NFO fund deployment | Securities and Exchange Board of India (Sebi) ने जाहीर केलं आहे की, एप्रिल 1, 2025 पासून म्युच्युअल फंड स्कीममध्ये गोळा केलेले पैसे 30 बिझनेस दिवसांत योग्य ठिकाणी गुंतवणे बंधनकारक होईल. हा निर्णय अॅसेट मॅनेजमेंट कंपन्या (AMCs) साठी लागू असेल.

NFO म्हणजे काय?

न्यू फंड ऑफर (NFO) ही एक नवीन म्युच्युअल फंड स्कीम असते, जिथे AMC गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा करते आणि त्यांना योग्य ठिकाणी (शेअर मार्केट, बॉन्ड्स, इ.) गुंतवते. ही स्कीम सुरू करताना, गुंतवणूकदारांना युनिट्स खरेदी करण्याची संधी दिली जाते.

NFO मध्ये पैसे वापरण्याची वेळ

न्यू फंड ऑफर (NFO) दरम्यान गोळा केलेले पैसे, Scheme Information Document (SID) मध्ये दर्शविलेल्या Asset Alocation प्रमाणे 30 बिझनेस दिवसांत गुंतवले जाणे आवश्यक आहे.

AMC ने NFO च्या वेळी हे टाइमलाइन स्पष्टपणे सांगणे बंधनकारक आहे. जर पैसे वेळेत गुंतवले नाहीत, तर Investment Committee समोर कारणे (लिखित स्वरूपात) सादर करावी लागतील.

अपवादात्मक परिस्थितीत विस्तार

जर AMC ला 30 दिवसात पैसे गुंतवणे शक्य नसेल, तर Investment Committee हा कालावधी आणखी 30 बिझनेस दिवस वाढवू शकते.

कमिटीने भविष्यात पैसे वेळेत गुंतवण्यासाठी सूचना देणे आणि प्रगतीचे निरीक्षण करणे अनिवार्य आहे.

हा निर्णय गुंतवणूकदारांचे रक्षण करण्यासाठी आणि म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये पारदर्शकता वाढविण्यासाठी घेण्यात आला आहे.

पोस्ट वाचा: Parag Parikh Flexi Cap Fund | पराग पारिख फ्लेक्सी कॅप फंड रिव्यू २०२५ मराठीमध्ये!

Social Media Links


Author

  • Marathi Finance म्हणजे मराठी लोकांसाठी आर्थिक माहितीसाठी एक सोपं आणि विश्वासार्ह प्लॅटफॉर्म. आमचं ध्येय अगदी स्पष्ट आहे – गुंतवणूक, बचत, कर्ज, विमा, शेअर बाजार आणि पैशांशी संबंधित इतर महत्त्वाच्या गोष्टींची माहिती अगदी सोप्या भाषेत देणं. आर्थिक गोष्टी समजून घ्या, मजबूत निर्णय घ्या – हाच आमचा हेतू. Marathi Finance च्या माध्यमातून आम्ही मराठी वाचकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि जागरूक बनवण्याचा प्रयत्न करतो.✌

    View all posts

Leave a Comment