म्युच्युअल फंडमध्ये CAGR म्हणजे काय?

CAGR Meaning in Marathi | आपण नेहमी एकतो की या Mutual Fund ने एवढा CAGR दिला आहे, तेवढा CAGR दिला आहे. पण हा CAGR नक्की आहे काय?

Compound Annual Growth Rate, किंवा CAGR, हा तुमची गुंतवणूक प्रत्येक वर्षी सरासरी किती वाढली आहे हे मोजण्याचा एक मार्ग आहे. CAGR हा साध्या Annual Return पेक्षा वेगळा असून, यामध्ये Compounding चा प्रभाव लक्षात घेतला जातो – म्हणजे प्रत्येक वर्षाच्या रिटर्नवर पुढील वर्षात अजून रिटर्न मिळतो.

त्यामुळे तुम्हाला एक सरळ आणि स्पष्ट वाढीचा दर कळतो जो तुम्हाला एखाद्या Investment ची इतर Investment Options सोबत तुलना करण्यास मदत करतो.

CAGR कसा मोजला जातो?

CAGR मोजण्यासाठी खालील Formula वापरला जातो:

  CAGR = (Ending Value / Beginning Value) ^ (1 / Number of Years) – 1

उदाहरणार्थ, जर तुम्ही ₹10,000 ची गुंतवणूक एका Mutual Fund मध्ये केली आणि ती गुंतवणूक 5 वर्षांत ₹15,000 पर्यंत वाढली, तर:

  CAGR = (15,000 / 10,000) ^ (1/5) – 1
  CAGR ≈ 8.45%

याचा अर्थ असा की तुमच्या गुंतवणुकीने दरवर्षी सरासरी 8.45% वाढ नोंदवली आहे किंवा एवढा रिटर्न दिला आहे. यालाच CAGR अस म्हणतात.

CAGR नक्की कसा काम करतो?

समजा तुम्ही ₹100,000 रुपयाच्या गुंतवणूकीने सुरुवात केली आणि ही गुंतवणूक 11 वर्षांत ₹2,10,000 पर्यंत वाढली. आता एक गोष्ट लक्षात घ्या. प्रत्येक वर्षीची वाढ वेगवेगळी असू शकते, जसे की काही वर्षी 8% रिटर्न मिळेल तर काही वर्षी 12% रिटर्न मिळेल. पण CAGR वापरल्यामुळे तुम्हाला एक सरासरी दर मिळतो.

CAGR = (1,00,000 / 1,55,000) ^ (1/11) – 1
  CAGR ≈ 4.06%

(उदा. साधारण 4.06% दरवर्षी वाढ) ज्यामुळे एकूण वाढ स्पष्टपणे कळते. CAGR मुळे विविध गुंतवणूक साधनासोबत तुलना करण्यास खूप सोप होते.

CAGR वापरण्याचे फायदे

  • Comparison सोप होत: विविध Investments चे वेगवेगळे वार्षिक Returns एकसारखे करून एकाच Average Rate म्हणजेच CAGR मध्ये काढता येते, ज्यामुळे Comparison करणे सोपे होते.
  • Long Term नियोजनासाठी: दरवर्षीच्या सरासरी वाढीचा अंदाज लावून भविष्यातील Investment ची Value कशी वाढेल याचा अंदाज लावता येतो.
  • Performance चेक करता येतो: कोणताही Mutual Fund असो किंवा एखादी Investment चा मागील Performance जाणून घेण्यासाठी CAGR तुम्हाला एक स्पष्ट दृष्टीकोन देतो.

थोडक्यात सांगायचे तर

  • CAGR म्हणजे Compound Annual Growth Rate, जो गुंतवणूकीची दर वर्षीची सरासरी वाढ मोजतो.
  • Calculation: सुरुवातीची रक्कम, शेवटची रक्कम आणि वर्षांची संख्या यांचा वापर करून CAGR मोजल जात.
  • Usefulness: Investments ची तुलना करणे, भविष्यातील प्लॅनिंग करणे आणि Performance चा आढावा घेणे यासारखे फायदे CAGR देतो.
Social Media Links

Author

  • Marathi Finance म्हणजे मराठी लोकांसाठी आर्थिक माहितीसाठी एक सोपं आणि विश्वासार्ह प्लॅटफॉर्म. आमचं ध्येय अगदी स्पष्ट आहे – गुंतवणूक, बचत, कर्ज, विमा, शेअर बाजार आणि पैशांशी संबंधित इतर महत्त्वाच्या गोष्टींची माहिती अगदी सोप्या भाषेत देणं. आर्थिक गोष्टी समजून घ्या, मजबूत निर्णय घ्या – हाच आमचा हेतू. Marathi Finance च्या माध्यमातून आम्ही मराठी वाचकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि जागरूक बनवण्याचा प्रयत्न करतो.✌

    View all posts

Leave a Comment