Power of Compounding | तुमच्या पैशाला कसं कामाला लावाल?

Power of Compounding | Compounding म्हणजे तुमच्या पैशाचं स्वतःहून काम करणं. गुंतवणुकीत तुम्ही सुरुवातीला जो पैसा टाकता, त्यावर व्याज मिळतं, आणि ते व्याज पुन्हा गुंतवलं जातं. अशा प्रकारे, वेळेसोबत तुम्हाला फक्त मूळ रक्कम नाही, तर त्यावर मिळालेल्या व्याजाचा फायदा मिळतो.

याला “व्याजावर व्याज” असं देखील म्हणतात. हे अगदी असं आहे जसं झाडाला पाणी घालून निगा राखली, तर ते झाड आपोआप फळ देतं. Compounding म्हणजे असाच आर्थिक फळ देणार एक झाड.

Marathi Finance Join on Threads

Compounding कशी काम करते?

Compounding ची जादू वेळेवर अवलंबून असते. जितका जास्त वेळ तुम्ही पैसा गुंतवाल, तितका जास्त फायदा होतो.

  1. मूळ रक्कम वाढते: तुम्ही जेवढा पैसा गुंतवाल, त्यावर व्याज मिळतं.
  2. पुन्हा गुंतवणूक होते: व्याजाची रक्कम मूळ गुंतवणुकीत सामील होते आणि त्यावरही व्याज मिळतं.
  3. लांब पल्ल्यात मोठा परतावा: वेळ गेल्यास तुम्हाला सुरुवातीला गुंतवलेल्या रकमेच्या कितीतरी पटीने फायदा होतो.

Compounding चा प्रभाव: गणिताच्या जादूचा अनुभव

जर तुम्ही ₹5,000 दरमहा SIP सुरू केली आणि 12% वार्षिक व्याजदराने 20 वर्षे गुंतवणूक केली, तर:

  • एकूण गुंतवणूक: ₹12 लाख
  • फंड व्हॅल्यू: ₹49.44 लाख

आणि जर तुम्ही कालावधी 30 वर्षांपर्यंत वाढवलात, तर:

  • फंड व्हॅल्यू: ₹1.76 कोटी

यातून दिसतं की Compounding च्या जादूचा फायदा लांब पल्ल्यातच जास्त होतो.

Compounding मध्ये लवकर गुंतवणूक सुरू करण्याचं महत्त्व (दोन मित्रांची गोष्ट)

उदाहरण:

यश आणि साजन, दोघे मित्र. पण गुंतवणुकीचा दृष्टिकोन वेगळा.

  • यश: 25व्या वर्षी SIP सुरू केली. दरमहा ₹5,000 SIP, 10 वर्षे गुंतवणूक केली.
  • साजण: 35व्या वर्षी SIP सुरू केली. दरमहा ₹5,000 SIP, 10 वर्षे गुंतवणूक केली.

गुंतवणुकीचा व्याजदर 12% असल्यास, शेवटी काय घडलं बघा:

गुंतवणूकदारएकूण गुंतवणूक60 व्या वर्षी फंड व्हॅल्यू
यश₹6 लाख₹95.5 लाख
साजन₹6 लाख₹32.9 लाख

यशला जास्त फायदा झाला कारण त्याने लवकर सुरुवात केली. (आता एथे आम्ही फक्त उदाहरण म्हणून 10 वर्षे गुंतवणूक केली अस सांगितल आहे. तुम्ही 10 वर्षापेक्षा जास्त करू शकता)

Compounding चा योग्य उपयोग कसा करायचा?

1. लवकर सुरुवात करा:

लांब पल्ल्याचा विचार करा. जितक्या लवकर सुरूवात कराल, तितका जास्त फायदा मिळेल.

2. सातत्य ठेवा:

शेअर बाजार चढ-उतारात असला, तरी SIP बंद करू नका. सातत्याने गुंतवणूक करा.

3. लांब पल्ल्याचा दृष्टिकोन ठेवा:

Compounding चा खरा फायदा 15-20 वर्षांनंतर जाणवतो. त्यामुळे अल्पकालीन दृष्टिकोन ठेवू नका.

4. गुंतवणुकीचं प्रमाण वाढवा:

दरवर्षी SIP चं प्रमाण थोडं-थोडं वाढवत राहा. यामुळे फंड व्हॅल्यूत लक्षणीय वाढ होईल.

Compounding चे आर्थिक फायदे

1. स्वप्नपूर्ती सोपी होते:

Compounding च्या मदतीने घर, गाडी किंवा रिटायरमेंटसाठी मोठा फंड तयार करता येतो.

2. महागाईवर मात:

महागाईच्या वेगापेक्षा जास्त गतीने पैसा वाढत असल्यामुळे आर्थिक सुरक्षेसाठी उपयुक्त ठरतो.

3. लहान सुरुवात, मोठा फायदा:

गुंतवणूक सुरू करण्यासाठी मोठी रक्कम आवश्यक नाही. ₹500 किंवा ₹1,000 पासूनही सुरुवात करता येते.

Power of Compounding साठी सोप्या टिप्स:

  1. कमाईचा 20% गुंतवा.
  2. सुरुवात लवकर करा.
  3. गुंतवणुकीवर लक्ष ठेवा, बाजाराच्या चढ-उतारावर नाही.
  4. SIP मध्ये सातत्य ठेवा.
  5. फंड निवडताना दीर्घकालीन उद्दिष्टं ठेवा.

शेवटचं पण महत्त्वाचं

Compounding ही एक “आर्थिक जादू” आहे. आजच्या छोट्या सुरुवातीमुळे उद्याचं आर्थिक स्वप्नं साकार होऊ शकतं. लहान पाऊल टाकून मोठं यश मिळवण्याचा हा सोपा फॉर्म्युला आहे. “पैसा झाडांवर उगवत नाही, पण Compounding मुळे तुम्ही झाड लावू शकता!

ही पोस्ट वाचा: Lakshya SIP: एक योजना, दोन फायदे – संपत्ती निर्माण होईल आणि उत्पन्नही मिळेल!

Author

  • Yash Awagan

    कसे आहात, मी आहे तुमचा १९ वर्षांचा Finance फॅन, पुस्तकांचा भोळा भक्त, आणि व्हिडिओ एडिटिंगचा उत्साही कलाकार, लहानपणापासून विज्ञानाच्या मार्गावर चाललो असलो तरी, मन मात्र Finance, Self help आणि व्हिडिओ एडिटिंगच्या कलाकारीत रमलंय. "Jack of all trades" म्हणू शकता, कारण कशातही कुतूहल असलं की, त्यातलं काहीतरी शिकायचं, शोधायचं, आणि लगेच इतरांना सांगायचं असं माझं सोपं तत्त्व आहे! माझं mission असं आहे की, Editing च्या सगळ्या styles शिकायच्या आणि नंतर त्या इतरांना सुद्धा अगदी आपल्या भाषेत शिकवायच्या. कारण हेच मला सगळ्यात जास्त excitement देतं! Market पासून Mutual funds पर्यंत, Self-help पासून Creative edits पर्यंत एकाचवेळी सगळ्यात घुसमटायचं मला! तर मंडळी, चला या ज्ञानाच्या आणि क्रिएटिव्ह सफरीवर, कारण मी फक्त बोलणार नाही शिकवणार, शिकणार, आणि मुख्य म्हणजे तुमच्यासोबत शिकणार 🙂

    View all posts

Leave a Comment