हायब्रिड म्यूचुअल फंड म्हणजे काय? | What is Hybrid Mutual Fund in Marathi

What is Hybrid Mutual Fund in Marathi: गुंतवणूकदारांची रिस्क लक्षात घेऊन गुंतवणुकीचे तीन मुख्य प्रकार असतात – इक्विटी (जास्त रिस्कची गुंतवणूक), डेट (कमी रिस्कची गुंतवणूक), आणि हायब्रिड गुंतवणूक. हायब्रिड म्युच्युअल फंड हे इक्विटी आणि डेट (Debt) गुंतवणुकीचे मिश्रण असते, ज्याचा उद्देश वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणूकदारांच्या आर्थिक गरजा आणि उद्दिष्टे पूर्ण करणे हा असतो. हायब्रिड म्यूचुअल फंड म्हणजे तुम्हाला एकाच फंडमध्ये इक्विटी म्हणजेच स्टॉक्समध्ये पैसे इन्वेस्ट करता येतात आणि डेट म्हणजे बोंडस किंवा इतर सेक्यूरिटीजमध्ये पैसे इन्वेस्ट करता येतात.

हायब्रिड म्युच्युअल फंडची उदाहरणे:

  • JM Aggressive Hybrid Fund
  • HDFC Balanced Advantage Fund
  • ICICI Prudential Multi Asset Fund

हायब्रिड म्युच्युअल फंडची वैशिष्ट्ये

हायब्रिड म्युच्युअल फंडचे काही मुख्य वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत:

१) मिश्र स्वरूप: हायब्रिड फंडात इक्विटी, डेट आणि इतर मालमत्तांचा समावेश असतो. एकाच फंडामध्ये विविध मालमत्तांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळते.

२) संतुलित पोर्टफोलिओ: हायब्रिड म्यूचुअल फंडचा पोर्टफोलिओ संतुलित स्वरूपाचे असते. यात लॉन्ग टर्म संपत्ती निर्माण करण्यासाठी इक्विटी असते, तर बाजारातील चढ-उतारापासून संरक्षण करण्यासाठी डेटचा समावेश असतो. त्यामुळे कमी रिस्क ठेवत चांगले रिटर्न मिळविण्याचा प्रयत्न केला जातो.

३) गुंतवणुकीचे वेगळे प्रकार: प्रत्येक हायब्रिड फंडची इक्विटी आणि डेटचा प्रमाण वेगळा असतो. काही फंड कमी रिस्क घेणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी असतात, तर काही फंड मध्यम किंवा हाय रिस्क घेणाऱ्यांसाठी असतात.

४) लॉन्ग टर्ममध्ये चांगली कामगिरी: हायब्रिड फंड हे कमीतकमी ३ ते ५ वर्षे गुंतवणुकीसाठी योग्य मानले जातात. लॉन्ग टर्म गुंतवणुकीसाठी हे फंड चांगली कामगिरी करत असल्याचे दिसून आले आहे.

हायब्रिड म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक का करावी?

१) संतुलित जोखीम: हायब्रिड फंड हे डेटम (Debt) फंडपेक्षा जास्त रिस्कवाले असले तरी इक्विटी फंडपेक्षा सुरक्षित असतात. त्यामुळे रिस्क कमी ठेवून चांगले रिटर्न मिळण्याची शक्यता वाढते.

२) नव्या गुंतवणूकदारांसाठी आदर्श: शेअर बाजारात नवीन असलेल्या गुंतवणूकदारांसाठी हायब्रिड फंड हे चांगला पर्याय ठरतात. डेटचा घटक स्थिरता देतो, तर इक्विटीमुळे जास्त रिटर्न मिळण्याची संधी असते.

३) बाजारातील चढ-उतारांपासून संरक्षण: हायब्रिड फंड गुंतवणूकदारांना बाजारातील प्रचंड चढ-उतारांपासून संरक्षण देतात. इक्विटीमुळे रिटर्न मिळतात, तर डेटमुळे स्थिरतेची हमी असते.

निष्कर्ष

हायब्रिड म्युच्युअल फंड हे इक्विटी आणि डेट यांचे उत्तम मिश्रण असल्यामुळे ते कमी रिस्क घेणाऱ्या आणि स्थिरता शोधणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी योग्य पर्याय ठरतात. तुमच्या आर्थिक उद्दिष्टांनुसार आणि रिस्क सहन करण्याच्या क्षमतेनुसार योग्य हायब्रिड फंड निवडून दीर्घकालीन संपत्ती निर्माण करू शकता.

ही पोस्ट वाचा: ELSS फंड म्हणजे काय?


तुम्हाला योग्य म्युच्युअल फंड सल्लागार हवा आहे का?

तुमच्यापैकी अनेक जण स्वतःचा पोर्टफोलिओ स्वतः मॅनेज करत असाल, पण जर तुम्हाला तुमचा पोर्टफोलिओ व्यवस्थित डिझाईन आणि मॅनेज करण्यासाठी एक म्यूचुअल फंड सल्लागार हवा असेल, तर तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता.

मी गेल्या 4 वर्षांपासून इंस्टाग्राम पेजच्या माध्यमातून म्युच्युअल फंडसंबंधी नॉलेज आणि प्रॅक्टिकल टिप्स शेअर करत आहे. आता वैयक्तिक सल्ला देऊन तुमचं आर्थिक भविष्य अधिक चांगलं बनवण्यासाठी नक्कीच हेल्प करेन.

तुम्हाला मिळणारे फायदे:

  1. तुमच्या गरजेनुसार पोर्टफोलिओ डिझाईन: तुमच्या फिनान्शिअल गोल्स आणि रिस्क प्रोफाइलनुसार योग्य फंड निवडून देतो.
  2. ट्रॅकिंग आणि रिव्ह्यू: पोर्टफोलिओ सतत अपडेट राहील याची काळजी घेतो.
  3. वेळ आणि ऊर्जा वाचवा: गुंतवणुकीसाठी योग्य सल्ला मिळाल्यामुळे तुम्हाला वेळेवर निर्णय घेता येईल.
  4. लॉंग टर्म फायद्याचा दृष्टिकोन: तुमच्या गुंतवणुकीवर चांगले रिटर्न्स मिळण्यासाठी योग्य मार्गदर्शन.

तुमचा आर्थिक प्रवास सुकर आणि यशस्वी बनवण्यासाठी माझ्याशी Whats App वर संपर्क साधा!

Author

  • Marathi Finance म्हणजे मराठी लोकांसाठी आर्थिक माहितीसाठी एक सोपं आणि विश्वासार्ह प्लॅटफॉर्म. आमचं ध्येय अगदी स्पष्ट आहे – गुंतवणूक, बचत, कर्ज, विमा, शेअर बाजार आणि पैशांशी संबंधित इतर महत्त्वाच्या गोष्टींची माहिती अगदी सोप्या भाषेत देणं. आर्थिक गोष्टी समजून घ्या, मजबूत निर्णय घ्या – हाच आमचा हेतू. Marathi Finance च्या माध्यमातून आम्ही मराठी वाचकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि जागरूक बनवण्याचा प्रयत्न करतो.✌

    View all posts

Leave a Comment