Zerodha चे Co-founder आणि CEO Nithin Kamath यांनी भारतीय स्टॉक मार्केट संदर्भात एक स्पष्ट इशारा दिला आहे. सध्याच्या परिस्थितीत, “जर शेअर मार्केट अजून जोरात खाली पडले, तर D-Street Investors कदाचित वर्षानुवर्षे शेअर मार्केटमध्ये येणार नाहीत.” असे त्यांनी म्हटले.
One of the crazy things about the last five-odd years is that retail investors have consistently been net buyers of equities. Whether they'll continue to buy the dip is anybody's guess. 😬 1/2 pic.twitter.com/cKFzDQG7gq
— Nithin Kamath (@Nithin0dha) April 8, 2025
Retail Investors चं योगदान
Kamath यांच्या मते, 2008 ते 2014 दरम्यान equity-oriented Mutual Fund schemes मध्ये Net Flows खूपच कमी झाला होता. तरीही, Kamath यांनी असेही नमूद केले की गेल्या पाच वर्षांत Retail Investors नी नेहमीच Equities मध्ये चांगली गुंतवणूक केली आहे. COVID-led market participation पासून त्यांनी संकटाच्या काळातही “buying into dips” करून बाजाराला पाठिंबा दिला आहे.
2008 चा Stock Market Crash
2008 मध्ये Lehman Brothers च्या collapse आणि US मधील Subprime Mortgage Crisis मुळे Global recession आले. Sensex ने January 2008 मध्ये 21,206 च्या शिखरावरून October 2008 मध्ये फक्त 8,160 पर्यंत घसरण केली – म्हणजेच 60% पेक्षा जास्त घसरण झाली. परंतु, Government च्या stimulus measures, Central Bank च्या सहभागामुळे आणि Global Liquidity मुळे 2009 मध्ये शेअर बाजार पुन्हा rebound झाला.
सध्याची शेअर मार्केटची स्थिति
सध्याच्या काळात, US President Donald Trump च्या Retaliatory Tariffs मुळे Global Trade War चे चिंतेमुळे भारतीय Stock Market मध्ये volatility वाढली आहे. BSE Sensex मध्ये 2,226.79 points म्हणजे 2.95% ची घट झाली आणि Nifty 50 मध्ये 742.85 points म्हणजे 3.24% ची घट दिसली – ही मागील 10 महिन्यांतील सर्वात वाईट single-day decline होती.
मात्र, दुसऱ्या दिवशी Nifty 50 ने तीन दिवसांची घट थांबवून तीन महिन्यांतली सर्वोत्तम session दाखवला, तर Sensex ने 1.69% वाढ नोंदवली. या rebound मुळे Investors ची Wealth ₹7.32 Lakh Crore ने वाढली.
अनेक D-Street Analysts चं मत आहे की, फक्त एका दिवसाच्या recovery वर जास्त विश्वास ठेवू नका कारण Tariff-related developments मुळे volatility कायम राहण्याची शक्यता आहे. Experts ने Traders ना Hedged Approach ठेवण्याची आणि Strength दाखवणाऱ्या Stocks वर लक्ष केंद्रित करण्याची सूचना केली आहे.
Gold Vs Nifty चा परफॉर्मेंस
Kamath यांनी सांगितले की Gold ने 2000 पासून Nifty 50 पेक्षा जास्त Returns दिले आहेत. Kamath ने शेअर केलेल्या 25 वर्षांच्या डेटा नुसार, Gold मध्ये सुमारे 2000% वाढ झाली, तर NSE Nifty 50 मध्ये 1,470% ची वाढ झाली आहे. 2025 मध्ये Gold ने 18% Return दिला तर Nifty LargeMid 250 ने 6% ची घट झाली.