Care Health Insurance ची Care Supreme पॉलिसी तुमच्यासाठी योग्य आहे का?

Care Health Insurance ची Care Supreme ही फक्त एक आरोग्य विमा पॉलिसी नाही, तर तुमचं आयुष्य सोपं करणारा एक विश्वासू साथीदार आहे. ह्या प्लॅनमध्ये तुमचा Sum Insured दरवर्षी वाढतो, Waiting Period कमी करता येतो, आणि अनेक Add-Ons मुळे तुम्हाला भरपूर सोयी मिळतात—जसे की तुमच्या पसंतीचा Room निवडण्याची मुभा आणि Domiciliary Cover (घरातच उपचाराची सुविधा). चला, Care Supreme पॉलिसीला सोप्या मराठीत सविस्तर माहिती घेऊ!

Social Media Links

Care Supreme देते किफायतशीर किंमतीत भरपूर फायदे

Care Supreme तुम्हाला कमी किमतीत चांगलं Cover देते. जरी Pre-Existing Disease (पहिल्यापासून असलेल्या आजारासाठी) साठी तीन वर्षांचा Waiting Period असला तरी, Asthma, Hypertension, Diabetes आणि Hyperlipidimia या आजारांसाठी हा कालावधी Add-On ने फक्त 30 दिवसात कमी केला जाऊ शकतो.

Care Supreme Health Insurance Policy ची मुख्य वैशिष्ट्ये

१) Renewal वर Special Bonus: प्रत्येक वेळी Policy Renew केल्यावर तुमचा Sum Insured 50% वाढतो – मग तुम्ही Claim करा किंवा नका करू. हा Bonus 500% पर्यंत वाढतो. (Sum Insured म्हणजे विमा कंपनी कडून मिळणारी कमाल रक्कम.)

२) No CoPay: इथे तुम्हाला CoPay भरायची गरज नाही. म्हणजेच, हॉस्पिटलचा Bill पूर्णपणे विमा कंपनी भरते. (CoPay म्हणजे उपचाराच्या वेळी तुमचा खिशातून जाणारा खर्चाचा भाग.)

३) Disease Sublimit Freedom: जर एखाद्या आजारासाठी Disease Sublimit नसेल, तर तुम्ही पूर्ण Sum Insured पर्यंतचा Claim करू शकता. (Disease Sublimit म्हणजे एखाद्या आजारासाठी ठेवलेली Cover ची मर्यादा.)

४) Restoration Benefit: एकदा Claim केल्यावरही Policy Reset होते आणि पुन्हा पूर्ण Cover मिळू शकते – अगदी नवीन आजारासाठीही. (Restoration Benefit म्हणजे Claim झाल्यानंतर Cover पुन्हा मिळण्याची सोय.)

५) Domiciliary Coverage: हॉस्पिटलमध्ये बेड न मिळाल्यास किंवा घरातच उपचार घ्यावे लागल्यास, पूर्ण खर्च कव्हर होतो. (Domiciliary Cover म्हणजे घरातून उपचार घेण्याची सोय.)

६) Room Rent Flexibility: Shared, Single किंवा Deluxe Room निवडण्याची मुभा आहे कारण Room Rent वर कोणतीही मर्यादा नाही. (Room Rent Limit म्हणजे हॉस्पिटलमध्ये कोणती रूम निवडायची यावर असलेली मर्यादा)

७) Pre & Post Hospitalization Expenses: हॉस्पिटलमध्ये जाण्यापूर्वी 60 दिवस आणि नंतर 180 दिवसांसाठीचा खर्च कव्हर होतो. (Pre & Post Hospitalization म्हणजे हॉस्पिटलमध्ये जाण्यापूर्वी आणि नंतरचा खर्च.)

७) Day Care Treatments & Alternative Medicine: 24 तासांपेक्षा कमी वेळासाठीचे Treatments (जसे Dialysis किंवा लहान शस्त्रक्रिया) कव्हर होतात. तसेच, Ayurvedic आणि Homeopathic सारख्या Alternative Medicine चेही कवच आहे. (Day Care Treatments म्हणजे कमी वेळासाठीचे Treatments, (Alternative Medicine म्हणजे पारंपारिक Treatments जसे Ayurveda, Homeopathy.)

८) Reasonable PED Waiting Period: जर तुम्हाला आधीपासूनच Diabetes किंवा हृदयाचे आजार असतील, तर 3 वर्षांचा Waiting Period लागतो. (PED: Pre-Existing Disease म्हणजे पहिल्यापासून असलेल्या आजारांचा कालावधी.)

९) Limited Free Health Check-Up: या प्लॅनमध्ये मोफत Health Check-Up ची सोय नाही, म्हणून ह्यासाठी Add-On घ्यावं लागेल.

Care Supreme Health Insurance Policy मधील उपयुक्त Add-Ons

Care Supreme चा फायदा अजून वाढवण्यासाठी खालील Add-Ons उपलब्ध आहेत. Add-Ons म्हणजे एक्स्ट्रा बेनिफिट ज्यासाठी तुम्हाला जास्त प्रीमियम द्याव लागत. हे Add-Ons तुम्ही तूमच्या मर्जीने पॉलिसीमध्ये Add करू शकता.

१) Instant Cover Add-On: Hypertension, Diabetes, Hyperlipidemia आणि Asthma सारख्या आजारांसाठी Waiting Period फक्त 30 दिवसात कमी करा. (Instant Cover: त्वरित कवच मिळवण्याचा Add-On.)

२) Annual Health Check-Up: दरवर्षी Network Centres मध्ये Health Check-Up मोफत मिळतो, Prescribed Tests नुसार. (Health Check-Up: संपूर्ण आरोग्य तपासणी.)

३) Air Ambulance Cover: आपत्कालीन परिस्थितीत 5 Lakhs पर्यंतचा Air Ambulance Cover उपलब्ध आहे.
(Air Ambulance: तातडीच्या प्रसंगी हवाई सेवेसाठी कवच.)

४) OPD Consultation Cover: दरवर्षी 4 Visits Each General Physician आणि Specified Specialist कडे जाण्यासाठी ₹500 प्रति Visit पर्यंत Reimbursement मिळतो. (OPD Consultations: हॉस्पिटलमध्ये न जाता डॉक्टरांचा सल्ला घेणे.)

५) Be-Fit Add-On: Empaneled Fitness Centres/Gyms चा अनलिमिटेड Access मिळवा आणि तुमचे Fitness चांगले ठेवा.

६) Cumulative Bonus Super: प्रत्येक Renewal नंतर तुमचा Bonus Cover वाढवला जातो, जो Base Sum Insured च्या 500% पर्यंत पोहोचतो. (Loyalty Benefit: दीर्घकालीन ग्राहकांसाठी वाढणारा कवच.)

७) Claim Shield Dressings, Bandages, Syringes यासारख्या वस्तूंचा खर्च 5-15% पर्यंत Cover करण्यासाठी हा Add-On आहे. (Claim Shield: लहान-मोठे Treatment साहित्य Cover करण्याचा Add-On.)

८) Reduction In PED: Pre-Existing Conditions साठीचा Waiting Period 36 महिन्यांपासून कमी करून 12 किंवा 24 महिन्यांपर्यंत करा. (Reduction In PED: पहिल्यापासून असलेल्या आजारांचा कालावधी कमी करण्याचा Add-On.)

Care Supreme Health Insurance Policy मध्ये काय छान आणि काय कमी?

छान पैलू:

  • सोपे आणि लवचिक कवच: Renewal Bonus, No CoPay आणि Room Rent मोकळं असल्यामुळे Care Supreme वेगळं ठरतं.
  • Restoration आणि Domiciliary Benefits: एकदा Claim केल्यावरही कवच परत मिळतं आणि घरातूनच उपचार घेता येतात.
  • विविध Add-Ons: तुमच्या गरजेनुसार Waiting Period कमी करा आणि Health Check-Up सारख्या Add-Ons घ्या.

कमी असलेला पैलू:

  • Free Health Check-Up नाही: काही इतर प्लॅनसारखा मोफत Health Check-Up इथे नाही, त्यामुळे ह्यासाठी Add-On घेणं आवश्यक आहे.

निष्कर्ष

Care Supreme हा एक सोपा, लवचिक आणि विश्वासू आरोग्य विमा प्लॅन आहे जो तुमच्या गरजेनुसार कवच वाढवतो. रोजच्या तसेच आपत्कालीन परिस्थितीत तुमचं आर्थिक संरक्षण करतो. तुम्ही जर त्वरित कवच शोधत असाल किंवा तुमचा कवच वाढत राहावा असं पाहिजे असेल, तर Care Supreme तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे.

Social Media Links

Author

  • Marathi Finance म्हणजे मराठी लोकांसाठी आर्थिक माहितीसाठी एक सोपं आणि विश्वासार्ह प्लॅटफॉर्म. आमचं ध्येय अगदी स्पष्ट आहे – गुंतवणूक, बचत, कर्ज, विमा, शेअर बाजार आणि पैशांशी संबंधित इतर महत्त्वाच्या गोष्टींची माहिती अगदी सोप्या भाषेत देणं. आर्थिक गोष्टी समजून घ्या, मजबूत निर्णय घ्या – हाच आमचा हेतू. Marathi Finance च्या माध्यमातून आम्ही मराठी वाचकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि जागरूक बनवण्याचा प्रयत्न करतो.✌

    View all posts

Leave a Comment