Investment Tips in Marathi: गुंतवणुकीत यशस्वी होण्यासाठी बेस्ट शेअर्स किंवा म्युच्युअल फंड निवडणं महत्त्वाचं नाही. मग सर्वात कठीण भाग कोणता आहे? सर्वात कठीण भाग हा आहे, जेव्हा शेअर बाजार पडतो आणि सगळे घाबरतात, तेव्हा शांत राहून गुंतवणूक टिकवून ठेवणं. भावनांवर नियंत्रण ठेवणं हेच खरे यश आहे. कारण?
तुमच्या पोर्टफोलिओसाठी सर्वात मोठा धोका शेअर बाजार नाही. सर्वात मोठा धोका आहे तो म्हणजे तुमचं स्वत:चं वागणं! तुमच्या भावना, तुमची घाई-गडबड, नुकसान होण्याची भीती… यांना मॅनेज करणं यशस्वी गुंतवणूकदाराची खरी ताकद असते.
गुंतवणूकदार का घाबरतात?
1️⃣ नुकसान सहन करण्याची भीती (Loss aversion): नुकसान अधिक तीव्र वाटतं. सगळ काही संपेल अशी भीती.
2️⃣ गर्दीचं अनुकरण (Herd mentality): “सगळे विकत आहेत, म्हणजे मलाही विकायला हवं!”
3️⃣ नकारात्मक बातम्यांवर प्रतिक्रिया: शेअर बाजार कोसळतो, मीडियावाले अजून त्यात मिर्च मसाला लावून बातम्या द्यायच काम करतात.
पण मग सत्य काय आहे?
जसा टाइम जातो गोष्टी सुधारतात. शेअर बाजार पुन्हा उभा राहतो. (कोरोंनामध्ये शेअर बाजार २०% ने पडल. पण पुन्हा उभ राहिलंच ना.) आकडेवारी सांगते, की संकटात शांत राहणारे गुंतवणूकदारच दीर्घकाळात चांगले रिटर्न कमावतात.
संकटाच्या वेळी शहाणे गुंतवणूकदार काय करतात?
✅ शांत राहतात: भावनिक निर्णय टाळतात.
✅ दीर्घकालीन विचार करतात: का गुंतवणूक केलीय, हे विसरत नाहीत.
✅ Rebalance करतात: मार्केट क्रॅश हे चांगले स्टॉक्स स्वस्तात खरेदी करण्याची संधी असते.
वॉरेन बफे यांनी सांगितल आहे!
“इतर लोक लोभी असतील तेव्हा तुम्ही घाबरा, आणि इतर घाबरले असतील तेव्हा लोभी व्हा.”
घाबरणं म्हणजे काहीतरी करण्याचा इशारा नाही—तर थांबून विचार करण्याचा संकेत आहे.
शिस्त हाच यशाचा मूलमंत्र आहे!
तुमच्या गुंतवणुकीच्या प्लॅनला चिकटून राहा. मार्केट पडल म्हणून त्यात लगेच बदल करायची गरज नाही. तसेच शक्य तेव्हा गुंतवणूक ऑटोमेट करा जस की महिन्याला आपोआप कट होणारी SIP. आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे नेगेटिव बातम्याकडे दुर्लक्ष करा. हे सगळ आता सोप वाटेल. पण जेव्हा मार्केट खरंच क्रॅश होत तेव्हा करायला तेवढंच कठीण. पण जे गुंतवणूकदार हे करतात ते शेवटी यशस्वी ठरतात.
निष्कर्ष
गुंतवणूक ही संयम आणि भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा खेळ आहे. आणि म्हणून गुंतवणुकीचा सर्वात कठीण भाग म्हणजे बाजार कोसळल्यावरही शांत राहणं. बेस्ट म्यूचुअल फंड किंवा बेस्ट स्टॉक्स एकदा निवडले की त्यामध्ये तुम्ही पैसे इन्वेस्ट करायला मोकळे होता. पण हेच स्टॉक्स आणि म्यूचुअल फंड जेव्हा रेडमध्ये दिसतात तेव्हा खरी परीक्षा होते एका खऱ्या गुंतवणूकदाराची. संयमी बना. हा प्रवास २०-२५ असेल.
(आणि हो, तुमच्यापैकी अनेक जण स्वता म्यूचुअल फंड निवडत असतील. स्वता मॅनेज करत असतील. पण ज्यांना खर्च प्रोफेशनल हेल्प हवी आहे एक चांगला रिटर्न देणारा, लॉन्ग टर्म म्यूचुअल फंड पोर्टफोलियो बनवायला. तर तुम्ही मला WhatsApp वर संपर्क करू शकता. मी एक AMFI रजिस्टर्ड म्युच्युअल फंड सल्लागार आहे. आपण सविस्तर बोलू)
ही पोस्ट वाचा: ELSS फंड म्हणजे काय? | What is ELSS Fund in Marathi?