Money Management Tips in Marathi | “मला पैसे सेव्ह करायचे आहेत” हे वाक्य ऐकून तुमचं मनही बोर झालं असेल? कारण हे Vague Goal आहे. Vague म्हणजे हे Goal स्पष्ट नाहीये.
कारण पैसे सेव्ह करायचे आहेत पण “किती? कसं? कधी?” या प्रश्नांची उत्तरे नसल्यामुळे, आपण पैसे सेव्ह करायचे प्रयत्नही थांबवतो.
पण ज्या लोकांनी Specific गोल सेट केले आहेत, त्यांना पैसे सेव्ह करणे सोप वाटतं. आता ते कसं करायचं? हेच आपण आज शिकणार आहोत.
Goal का असल पाहिजे?
Example: गावाकडे जायचंय, पण गाडीत पेट्रोल नसेल तर काय होईल? तुम्ही गावी पोचू शकणार नाही. Goal म्हणजे तुमच्या प्रवासाचं पेट्रोल!
स्पष्ट Goal असल्याचे फायदे:
- मनाला फोकस मिळतं (“₹१ लाख सेव्ह करायचे डिसेंबरपर्यंत” असं म्हटल्यावर नको ते खर्च थांबतो).
- प्रगती मोजता येते (वर्षाला 1 लाख म्हणजे महिन्याला ₹८,३३३ सेव्ह करायचे!)
- Confidence वाढतो (“मी करू शकतो” ही भावना निर्माण होते)
“सेव्ह मनी” बोलण पुरेसं नाही! का?
“सेव्ह मनी” हे खाली promise आहे. उदाहरणार्थ:
- Vague Goal: शाळेची फी भरायला पैसे जमवायचे.
- Result: पैसे वाचवायला कधीही सुरुवात होत नाही.
- SMART Goal: २ वर्षांत ₹२ लाख सेव्ह करणे (महिना ₹८,३३३).
- Result: ठरवलेल्या रकमेची SIP, FD करता येते.
SMART गोल कसे सेट कराल?
SMART म्हणजे: Specific, Measurable, Achievable, Relevant, Time-bound.
चला, एका टेबलमधून समजूया:
उदाहरण | SMART गोल |
---|---|
लग्नासाठी पैसे | १८ महिन्यांत ₹५ लाख सेव्ह करणे |
फिरायला जायचंय | डिसेंबरपर्यंत ₹५०,००० ट्रॅव्हल फंड |
EMI मुक्त होणे | ५ वर्षांत ₹१० लाख लोन चुकवणे |
स्मार्ट गोल सेट करण्यासाठी Step-by-Step प्लॅन:
१. किती हवं? (उदा: ₹१ लाख).
२. कधी पर्यंत? (उदा: १२ महिने).
३. महिन्याला किती? (₹८,३३३).
४. कुठे ठेवणार? (RD, SIP, किंवा सेव्हिंग्स अकाउंट)
पैसे सेव्ह करण्याचे टिप्स
- ५०-३०-२० रूल: पगाराचे ५०% बिल्स, ३०% खर्च, २०% सेव्हिंग्स.
- ऑटोमेटिक सेव्ह: बँकमध्ये auto-transfer सेट करा. पैसे डोळ्यापुढे नसले तर खर्चही कमी!
- छोट्या खर्चावर नियंत्रण: रोज ₹५० च बाहेर खाण = महिना ₹१,५०० = वर्षा ₹१८,०००! बाहेर खाण कमी, सेव्हिंग्स जास्त!
अडचणी” येणारच पण हरू नका!
- अनपेक्षित खर्च (मेडिकल, कारची दुरुस्ती): इमर्जन्सी फंडमध्ये ३-६ महिन्यांचा खर्च एवढा पैसा ठेवा.
- गोल पूर्ण न झाला तर?: झालेल्या प्रगतीवर Pride घ्या. Deadline वाढवा, पण गोल सोडू नका!
एखाद्या Dream साठी पैसे सेव्ह करायचे असतील (घर, बायकोचा सोन्याचा हार, मुलाचे शिक्षण), तर आजच एक कागद घ्या आणि लिहा:
“माझा गोल: [₹X] सेव्ह करायचं [Month/Year] पर्यंत. महिन्याला [₹Y] बाजूला ठेवणार!”
जसं शेतकऱ्याला पीक घ्यायचं असेल तर वेळेवर पेरणी करावी लागते, तसंच सेव्हिंग्सचं पीक घेण्यासाठी आजच planning सुरू करा!
पोस्ट वाचा: Money Management | तुमचे पैसे दोन मार्गांनी वापरू शकता पण कोणता मार्ग योग्य आहे?
पोस्ट वाचा: Health Insurance | आरोग्य विमा पॉलिसी Renew न करणे पडेल महागात!
पोस्ट वाचा: Mid Cap Mutual Fund | मिड कॅप म्युच्युअल फंड्स म्हणजे काय?