Mutual Fund मधून पैसे काढल्यावर ते बँक खात्यात कधी येणार?

Telegram Link

Mutual Fund Redemption Time: म्युच्युअल फंडमधून पैसे काढताना अनेक गुंतवणूकदारांच्या मनात एकच प्रश्न असतो – “पैसे माझ्या बँक खात्यात किती दिवसात येतील?” हा टाईम मुख्यतः तीन गोष्टींवर अवलंबून असतो – तुम्ही कोणत्या प्रकारच्या फंडातून पैसे काढत आहात, कोणत्या दिवशी आणि कोणत्या वेळी काढत आहात. चला, हे सविस्तर समजून घेऊ.

1) फंडाचा प्रकार

तुम्ही कोणत्या प्रकारच्या म्युच्युअल फंडातून पैसे काढता यावर सगळ्यात जास्त वेळ ठरतो. जर तुम्ही लिक्विड फंडमधून पैसे काढत असाल, तर पैसे सहसा T+1, म्हणजे व्यवहाराच्या दुसऱ्या दिवशी बँक खात्यात येतात. काही वेळा ते 1-2 व्यावसायिक दिवसात मिळू शकतात. (T +1 म्हणजे Transaction + 1 Day)

पण जर तुम्ही इक्विटी फंड किंवा डेट फंडमधून पैसे काढत असाल, तर यासाठी 2-4 व्यावसायिक दिवस (Business Days) लागू शकतात. काही इंटरनॅशनल फंड किंवा विदेशी गुंतवणुकीशी संबंधित फंडांसाठी पैसे मिळण्यास 5 किंवा त्याहून अधिक व्यावसायिक दिवस लागू शकतात. पैसे मिळण्यासाठी लागणारा सगळा टाईम हा फंडाच्या प्रकारावर आणि संबंधित फंड हाऊसच्या प्रक्रिया वेगावर अवलंबून असतो.

2) अर्जाचा दिवस

तुम्ही फंडातून पैसे काढण्यासाठी कोणत्या दिवशी अर्ज किंवा रिक्वेस्ट करता हेही महत्त्वाचं असतं. जर तुम्ही सोमवारी अर्ज केला आणि त्या दिवशी मार्केट सुरू असेल, तर प्रोसेस लगेच सुरू होते. पण जर तुम्ही रविवारी किंवा सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी अर्ज केला, तर तुमचा अर्ज पुढच्या व्यावसायिक दिवशी प्रोसेस होतो.

याशिवाय, जर तुम्ही शुक्रवारच्या संध्याकाळी अर्ज केला आणि शनिवारी किंवा सोमवारी सुट्टी असेल, तर प्रक्रिया आणखी पुढे ढकलली जाऊ शकते. म्हणून अर्ज करताना आठवड्याचा दिवस आणि सुट्ट्यांची स्थिती तपासूनच निर्णय घ्यावा. (एक उदाहरण बघा)

3) अर्जाची वेळ

अर्ज करताना वेळही तितकीच महत्त्वाची असते. जर तुम्ही फंडातून पैसे काढण्यासाठी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेच्या दरम्यान अर्ज करता, तर त्याच दिवशीच्या NAV (Net Asset Value) नुसार तुमचा व्यवहार प्रोसेस होतो. पण जर तुम्ही रात्री उशिरा, म्हणजे मार्केट बंद झाल्यानंतर अर्ज केला, तर तो पुढच्या व्यावसायिक दिवशी consider केला जातो. त्यामुळे पैसे बँकेत येण्याचा दिवस एक दिवस पुढे ढकलला जातो.

निष्कर्ष

म्युच्युअल फंडमधून पैसे काढताना 1 ते 5 व्यावसायिक दिवस लागू शकतात. हे पूर्णपणे फंडाच्या प्रकारावर, अर्जाच्या करण्याची दिवस, आणि अर्जाच्या वेळेवर अवलंबून असतं. काही वेळा गुंतवणूकदारांना वाटतं की पैसे उशीराने येत आहेत, पण वर सांगितलेल्या गोष्टी लक्षात घेतल्या तर हा वेळ अगदी नैसर्गिक आणि ठरलेला असतो.

म्युच्युअल फंड इतर गुंतवणूक साधनांच्या तुलनेत पैसे काढण्यासाठी एक सोपा, सुरक्षित आणि पारदर्शक पर्याय आहे. थोडा वेळ लागतो, पण पैसे खात्रीने येतात, हे नक्की!

ही पोस्ट वाचा: Thematic Mutual Fund मध्ये गुंतवणूक करायचीय? आधी हे वाचा!

Author

  • Marathi Finance म्हणजे मराठी लोकांसाठी आर्थिक माहितीसाठी एक सोपं आणि विश्वासार्ह प्लॅटफॉर्म. आमचं ध्येय अगदी स्पष्ट आहे – गुंतवणूक, बचत, कर्ज, विमा, शेअर बाजार आणि पैशांशी संबंधित इतर महत्त्वाच्या गोष्टींची माहिती अगदी सोप्या भाषेत देणं. आर्थिक गोष्टी समजून घ्या, मजबूत निर्णय घ्या – हाच आमचा हेतू. Marathi Finance च्या माध्यमातून आम्ही मराठी वाचकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि जागरूक बनवण्याचा प्रयत्न करतो.✌

    View all posts

Leave a Comment