Mutual Fund SIP: ₹5,000 मासिक SIP ने कमवा ₹1 कोटी – या फंडाने कसे होईल शक्य?

Mutual Fund SIP Returns: गुंतवणूकदार नेहमीच Mutual Fund मध्ये गुंतवणूक करताना विशिष्ट योजनांच्या ऐतिहासिक रिटर्नचा विचार करतात. आणि यात काही चुकीच नाहीये. कारण चांगले रिटर्न कोणाला नाही आवडत. जेव्हा तुम्ही Large Cap श्रेणीतील Mutual Fund निवडता, तेव्हा त्याचा इतर योजनांसोबत रिटर्नची तुलना करणे गरजेच असत. हे तुम्हाला सध्याच्या गुंतवणूकदारांना मिळणाऱ्या रिटर्नचे आणि भविष्यातील वाढीच्या संधीचे विश्लेषण करण्यास मदत करते.

आज आपण ICICI Prudential Bluechip Fund या Large Cap Mutual Fund योजनेवर लक्ष केंद्रित करू. या योजनेला मे २००८ मध्ये सुरुवात झाली होती आणि तेव्हापासून या योजनेने सरासरी १५.९२% वार्षिक रिटर्न दिला आहे. तुम्ही नियमितपणे SIP द्वारे ₹5,000 गुंतवणूक करत राहिल्यास 1 कोटीचा फंड कधी तयार होईल हे समजण्यासाठी खालील माहिती दिली आहे.

ICICI Prudential Bluechip Fund मध्ये ₹5,000 SIP ने वाढता फंड

सदर योजनेत दर महिन्याला ₹5,000 SIP द्वारे गुंतवणूक केल्यास, किती कालावधीत आपण ₹1 कोटींच्या फंडचे उद्दिष्ट गाठू शकतो हे खालील आकडेवारीत दाखवले आहे:

कालावधीगुंतवणूक रक्कम (₹)एकूण कोष (₹)
५ वर्षे३,००,०००६,३८,८२३
१० वर्षे६,००,०००१७,०८,४७१
१५ वर्षे९,००,०००४१,३८,३६१
२० वर्षे१२,००,०००८१,२१,५३५
२१ वर्षे१२,६०,०००१,०१,४२,१६८

₹1 कोटीचा टप्पा साध्य करण्यासाठी लागणारा वेळ

वर दिलेल्या आकडेवारीवरून, जर आपण ICICI Prudential Bluechip Fund मध्ये ₹5,000 च्या मासिक SIP ने गुंतवणूक केली, तर अंदाजे २१ वर्षांनी आपल्याला ₹1 कोटींचा एकूण फंड प्राप्त होऊ शकतो. या दीर्घकालीन SIP गुंतवणुकीमुळे, ₹१२.६० लाख गुंतवणुकीवर ₹1 कोटींपेक्षा अधिकची संपत्ती तयार होते.

या Mutual Fund स्कीमचे वैशिष्ट्ये आणि रिटर्न

ICICI Prudential Bluechip Fund हा एक कमी रिस्क असलेला फंड आहे. परंतु, त्याचे ऐतिहासिक रिटर्न आणि Nifty 100 TRI या बेंचमार्क इंडेक्सच्या तुलनेत चांगली कामगिरी यामुळे हा फंड विश्वासार्ह ठरतो. बेंचमार्क इंडेक्सने १२.५६% वार्षिक रिटर्न दिला असताना, या फंडाने १५.९२% वार्षिक रिटर्न दिला आहे.

या फंडाच्या प्रमुख कंपन्यांमध्ये ICICI Bank, HDFC Bank, L&T, Infosys, RIL, Maruti Suzuki, Bharti Airtel, Axis Bank, Ultratech Cement, Sun Pharma आणि Hero MotoCorp यांचा समावेश आहे. तसेच, फंड मॅनेजर अनिश तवकले आणि वैभव दुसाद यांच्या मार्गदर्शनाखाली हा फंड सातत्याने वाढत आहे.

आता हा Mutual Fund कोणासाठी योग्य आहे?

प्रत्येकाच्या Mutual Fund पोर्टफोलियो मध्ये एक तरी लार्ज कॅप फंड असावा. काही जण लार्ज कॅप फंड न घेता Index Fund घेणे सोयीच समजतात. पण त्यांच्याकडे जास्त रिटर्नसाठी Small Cap Fund किंवा Mid Cap Fund असतात. पण लोक ज्यांच्याकडे एवढी रिस्क घ्यायची तयारी नाही मग त्यांच वय जास्त असो की काही दुसर कारण. आशा गुंतवणूकदारांनी ICICI Prudential Bluechip Fund घेणे योग्य ठरेल.

निष्कर्ष

ICICI Prudential Bluechip Fund हा दीर्घकालीन SIP गुंतवणुकीसाठी उत्कृष्ट पर्याय आहे, विशेषतः ₹1 कोटीचे लक्ष साध्य करण्यासाठी. परंतु, रिस्क लक्षात घेऊनच गुंतवणूक करावी. LargeCap Fund च्या रिटर्नवर आधारित, ही योजना दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी आणि आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

Marathi Finance Join on Threads
ही पोस्ट वाचा: SBI Mutual Fund ने रचला इतिहास: 10 लाख कोटींचा टप्पा ओलांडला, इतर फंड्स किती मागे?

FAQs

ICICI Prudential Bluechip Fund उच्च वार्षिक रिटर्न (१५.९२%) देते, जो Nifty 100 TRI च्या १२.५६% च्या तुलनेत अधिक आहे. याशिवाय, या फंडामध्ये नामांकित कंपन्यांचे समावेश असल्यामुळे दीर्घकालीन संपत्ती निर्मितीच्या दृष्टीने तो सुरक्षित मानला जातो.

SIP म्हणजे दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवणूक करणे. यामुळे गुंतवणूकदारांना मार्केटच्या चढ-उतारांवर कमी अवलंबित्व राहते आणि लांब पल्ल्याची गुंतवणूक करणे सुलभ होते.

ICICI Prudential Bluechip Fund मध्ये ₹5,000 च्या मासिक SIP द्वारे गुंतवणूक केल्यास, अंदाजे २१ वर्षांनी आपल्याला ₹१ कोटींचा एकूण कोष मिळवता येईल.

ICICI Prudential Bluechip Fund हा अत्यंत उच्च जोखमीचा फंड आहे. त्यामुळे गुंतवणूक करताना बाजारातील चढ-उतारांमुळे नुकसान होण्याची शक्यता असते. गुंतवणूकदारांनी त्यांच्या जोखमीच्या क्षमतेनुसार गुंतवणूक निर्णय घ्यावे.

या फंडामध्ये ICICI Bank, HDFC Bank, L&T, Infosys, RIL, Maruti Suzuki, Bharti Airtel, Axis Bank, Ultratech Cement, Sun Pharma आणि Hero MotoCorp यासारख्या प्रमुख कंपन्यांचा समावेश आहे. यामुळे या फंडाची सुरक्षितता वाढते.

Author

  • Marathi Finance म्हणजे मराठी लोकांसाठी आर्थिक माहितीसाठी एक सोपं आणि विश्वासार्ह प्लॅटफॉर्म. आमचं ध्येय अगदी स्पष्ट आहे – गुंतवणूक, बचत, कर्ज, विमा, शेअर बाजार आणि पैशांशी संबंधित इतर महत्त्वाच्या गोष्टींची माहिती अगदी सोप्या भाषेत देणं. आर्थिक गोष्टी समजून घ्या, मजबूत निर्णय घ्या – हाच आमचा हेतू. Marathi Finance च्या माध्यमातून आम्ही मराठी वाचकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि जागरूक बनवण्याचा प्रयत्न करतो.✌

    View all posts

Leave a Comment