फेब्रुवारी 2025 मध्ये Mutual Funds चा परफॉर्मेंस चांगला – तुमची गुंतवणूक कशी काम करतेय?

Equity mutual funds outperform benchmarks | फेब्रुवारी 2025 मध्ये, PL Wealth Management च्या अहवालानुसार 54% equity mutual funds ने त्यांच्या benchmarks पेक्षा जास्त रिटर्न दिले. मात्र, sector आणि thematic funds वगळता, एकूण AUM (Assets Under Management) Rs 24.85 लाख कोटी पासून Rs 23.12 लाख कोटीपर्यंत 6.97% नी घट झाली.

Mutual Fund Benchmark म्हणजे काय?

Mutual fund benchmark म्हणजे एक standard index आहे ज्याच्या आधारावर mutual fund च्या performance ची तुलना केली जाते. ही index एखाद्या specific market किंवा sector चे प्रतिनिधित्व करते. जर mutual fund ने benchmark पेक्षा चांगल performance केल तर त्याचा अर्थ तो broader market पेक्षा जास्त चांगल कामगिरी करत आहे. (उदाहरण द्यायच झाल तर Large Cap Fund चा Benchmark Index सहसा Nifty 100 Index असते.)

Mutual Fund प्रकारानुसार कामगिरी

  • Small-Cap Funds: जवळपास 80% small-cap funds ने benchmarks ओलांडली, जे कठीण बाजार परिस्थितीतही चांगली कामगिरी दाखवतात.
  • Focused Funds आणि Large & Mid-Cap Funds: सुमारे 68% आणि 66% एवढ्या Mutual funds नी त्यांच्या benchmarks पेक्षा जास्त रिटर्न दिला.
  • Large Cap Funds: फक्त 22% large cap funds ने benchmarks ओलांडली, ज्यामुळे या विभागात काही अडचणी दिसून येतात.

Mutual Fund चे वार्षिक आणि मासिक ट्रेंड्स

फेब्रुवारी 2025 पर्यंतच्या वर्षभरातील 282 open-ended equity diversified funds पैकी सुमारे 67% funds ने benchmarks ओलांडली आहे. याउलट, मागील महिन्यात ही टक्केवारी 70.29% होती. यामुळे फंड कामगिरीत होणारे बदल बाजाराच्या परिस्थितीवर अवलंबून असल्याचे दिसून येते.

शेअर मार्केटची परिस्थिती आणि Index Returns

त्या कालावधीत, प्रमुख indices ने खालील प्रमाणात रिटर्न दिला:

  • Nifty 50 TRI: -3.49%
  • Nifty Midcap 150 TRI: -6.58%
  • Nifty Small Cap 250 TRI: -8.46%
    ही घट दर्शवतात की index funds साठी बाजारात किती कठीण काळ होता.

Mutual Fund मध्ये दीर्घकालीन गुंतवणूक दृष्टीकोन

तत्कालीन अडचणी असूनही, दीर्घकालीन गुंतवणूक धोरणे आशादायक ठरतात. Top equity funds मधील Systematic Investment Plans (SIPs) वापरून गुंतवणूकदारांनी गेल्या तीन वर्षात दरवर्षी सरासरी 12% पेक्षा जास्त रिटर्न मिळवला आहे. यामुळे दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवणे किती फायदेशीर ठरते हे सिद्ध होते.

निष्कर्ष

अहवालातून असे दिसून येते की, बाजार परिस्थिती कठीण असली तरी योग्य फंड निवड आणि दीर्घकालीन धोरणामुळे चांगले रिटर्न मिळवता येतात. विशेषतः small-cap funds आणि focused funds या कठीण काळात चांगल्या संधी देतात, ज्यामुळे ते एक diversified investment portfolio चा महत्त्वाचा भाग बनतात. पण यामध्ये गुंतवणूक करताना स्वताची रिस्क क्षमता ओळखा मग पैसे गुंतवा.

Social Media Links

Author

  • Marathi Finance म्हणजे मराठी लोकांसाठी आर्थिक माहितीसाठी एक सोपं आणि विश्वासार्ह प्लॅटफॉर्म. आमचं ध्येय अगदी स्पष्ट आहे – गुंतवणूक, बचत, कर्ज, विमा, शेअर बाजार आणि पैशांशी संबंधित इतर महत्त्वाच्या गोष्टींची माहिती अगदी सोप्या भाषेत देणं. आर्थिक गोष्टी समजून घ्या, मजबूत निर्णय घ्या – हाच आमचा हेतू. Marathi Finance च्या माध्यमातून आम्ही मराठी वाचकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि जागरूक बनवण्याचा प्रयत्न करतो.✌

    View all posts

Leave a Comment