NSDL IPO: National Securities Depository Ltd (NSDL) ही भारतातील सर्वात मोठी depository company आहे, जी भारतीय वित्तीय आणि securities market साठी महत्त्वपूर्ण सेवा पुरवते. SEBI कडे registered असलेली NSDL ही एक Market Infrastructure Institution (MII) आहे, ज्याद्वारे बाजारातील व्यवहार अधिक सुलभ होतात. जर तुमच्याकडे Demat Account असेल तर एकदा तपासून बघा – तुमची Depository NSDL किंवा CDSL असणार. या depositories चे काम म्हणजे शेअर्स आणि mutual funds units ला इलेक्ट्रॉनिक फॉरमॅटमध्ये सुरक्षित ठेवणे. आणि भारतात हे काम करणाऱ्या फक्त 2 कंपन्या आहेत. (आता माझ Demat अकाऊंट Zerodha मध्ये आहे म्हणून एथे CDSL आहे कारण Zerodha ने CDSL सोबत टाय अप केल आहे. एथे NSDL सुद्धा असत. म्हणून तुमचं Demat Account चेक करा)
NSDL IPO आणि त्यातील विक्री प्रस्ताव
SEBI ने NSDL ला IPO सुरू करण्यासाठी मंजुरी दिली असून, यामध्ये “Offer for Sale” (OFS) अंतर्गत 5,72,60,001 शेअर्सचा समावेश असेल. IDBI Bank, NSE, SBI, HDFC Bank, आणि Union Bank of India यांचा stake कमी होणार आहे.
NSDL च्या Draft Red Herring Prospectus (DRHP) नुसार, IPO मध्ये सहा प्रमुख shareholders आपले shares विकणार आहेत. यात IDBI Bank कडून 22.2 million shares, NSE कडून 18 million shares, Union Bank of India कडून 5.62 million shares, SBI आणि SUUTI कडून अनुक्रमे 4 million आणि 3.4 million shares विकले जाणार आहेत, तर HDFC Bank देखील 4 million shares विकणार आहे.
NSDL चं विशाल नेटवर्क आणि ग्राहक आधार
31 मार्च 2023 पर्यंत, NSDL कडे 31.46 million पेक्षा जास्त active demat accounts होते, जे 283 authorized depository participants ( म्हणजे Zerodha, Groww अशा कंपन्या) मार्फत चालवले जातात. हे account holders भारतातील 99% पेक्षा जास्त postal codes आणि 186 देशांमध्ये पसरलेले आहेत. शिवाय, 31 मार्च 2023 पर्यंत NSDL कडे तब्बल 40,987 issuers registered होते, ज्यामुळे या क्षेत्रात NSDL ची ताकद दिसून येते.
SEBI ची मंजुरी आणि IPO चे महत्व
NSDL ने आपला DRHP 7 जुलै 2023 रोजी SEBI कडे सबमिट केला होता. सुरुवातीला, ऑगस्ट 2023 मध्ये SEBI ने काही कारणांमुळे IPO थांबवला होता. परंतु आता, SEBI ने final observation दिल्यानंतर IPO ला हिरवा कंदील दाखवला आहे. मात्र, SEBI ला ongoing investigation किंवा regulatory माहिती अपूर्ण असल्यास IPO थांबवण्याचा अधिकार आहे.
Book-Running Team कोणाकडे आहे?
NSDL IPO साठी ICICI Securities, Axis Capital, HSBC Securities and Capital Markets (India), IDBI Capital Markets and Securities Ltd, Motilal Oswal Investment Advisors Ltd, आणि SBI Capital Markets Ltd हे book-running lead managers म्हणून काम पाहत आहेत.
NSDL IPO मध्ये गुंतवणूक का करावी?
NSDL ने भारतीय financial services industry साठी विविध products आणि services तयार करून आर्थिक क्षेत्राच्या वाढीला हातभार लावला आहे. हे IPO गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाचा संधी असू शकतो, कारण NSDL ची position ही भारताच्या आर्थिक व्यवस्थेत एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. आणि तुम्ही सुद्धा या कंपनीच्या सर्विसेस कळत, नकळत वापरत आहात. तुमच्याकडे कुठल Demat अकाऊंट आहे यावर ते अवलंबून आहे. एकतर CDSL किंवा NSDL यापैकी एक कंपनी असेल.
निष्कर्ष
NSDL च्या IPO ला SEBI ची मंजुरी मिळाल्यानंतर आता या क्षेत्रातील अनेक मोठ्या भागीधारकांचे stake विकले जाणार आहे. जर तुम्ही बाजारातील आर्थिक क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या विचारात असाल तर NSDL चा IPO नक्कीच विचारात घ्या.
ही पोस्ट वाचा: Sagility India IPO ची संपूर्ण माहिती - अप्लाय करण्याआधी वाचा
FAQs
NSDL म्हणजे काय आणि त्याचे कार्य काय आहे?
NSDL (National Securities Depository Ltd) ही भारतातील सर्वात मोठी depository company आहे, जी शेअर्स आणि mutual funds units ला इलेक्ट्रॉनिक स्वरूपात सुरक्षित ठेवण्याचे काम करते.
NSDL च्या IPO मध्ये कोणते शेअर्स उपलब्ध आहेत?
NSDL IPO मध्ये “Offer for Sale” (OFS) अंतर्गत 5.7 कोटी शेअर्स उपलब्ध असतील, ज्यात IDBI Bank, NSE, SBI, HDFC Bank, आणि Union Bank of India यांचे stakes कमी होणार आहेत.
NSDL IPO मध्ये गुंतवणूक का करावी?
NSDL ही भारतीय वित्तीय क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणारी कंपनी आहे. तिच्या मजबूत network आणि विविध सेवांमुळे, हा IPO गुंतवणूकदारांसाठी चांगली संधी ठरू शकतो.
NSDL IPO ची book-running team कोण आहे?
NSDL IPO साठी ICICI Securities, Axis Capital, HSBC Securities and Capital Markets (India), IDBI Capital Markets and Securities Ltd, Motilal Oswal Investment Advisors Ltd, आणि SBI Capital Markets Ltd हे lead managers आहेत.
NSDL IPO साठी SEBI ची मंजुरी कधी मिळाली?
NSDL ने आपला Draft Red Herring Prospectus (DRHP) 7 जुलै 2023 रोजी SEBI ला सबमिट केला होता, आणि अलीकडेच SEBI ने final observation देत IPO सुरू करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे.