Wipro Q4 Results: निव्वळ नफा 6.4% ने वाढला, Revenue मात्र अपेक्षेपेक्षा कमी

Wipro Q4 FY25 Result: Wipro, ही भारतातली मोठी IT कंपनी, हिने मार्च 2025 अखेरच्या तिमाहीचे (Q4) निकाल जाहीर केले. कंपनीचा नफा वाढलेला आहे, पण Revenue मात्र थोडा कमी आहे. चला या निकालांची एकदम सोप्या भाषेत झलक बघूया.

Wipro Q4 निकालाचे मुख्य मुद्दे

  • निव्वळ नफा (Net Profit): ₹3,569.6 कोटी, मागील तिमाहीपेक्षा 6.4 टक्क्यांनी वाढ.
  • एकूण महसूल (Revenue): ₹22,504.2 कोटी, विश्लेषकांच्या ₹23,112.5 कोटींच्या अपेक्षेपेक्षा कमी.
  • IT सेवा महसूल (USD मध्ये): $2.60 अब्ज, तिमाहीत 1.2 टक्के आणि वार्षिक 2.3 टक्के घट., Constant currency मध्ये 0.8 टक्के घसरण.
  • ऑपरेटिंग मार्जिन: 17.5 टक्के, वार्षिक 1.1 टक्क्यांनी वाढ.
  • लाभांश (Dividend): ₹6 प्रति शेअर, हा Interim लाभांश अंतिम लाभांश म्हणून मान्यता.
  • ऑपरेटिंग कॅश फ्लो: ₹3,746.5 कोटी, निव्वळ नफ्याच्या 104.4 टक्के इतका मजबूत कॅश फ्लो.

CEO आणि CFO काय म्हणाले?

Srini Pallia (CEO): “कंपनीने FY25 चांगल्या deal wins आणि customer growth ने पूर्ण केलं. अजूनही clients थोडे सावध आहेत, पण आम्ही त्यांच्याबरोबर जवळून काम करत आहोत.”

Aparna Iyer (CFO): “आमचं focus खर्चावर होतं, म्हणून जरी revenue कमी झालं तरी margin वाढले. पुढच्या तिमाहीतही हे मार्जिन टिकवून ठेवायचं आमचं लक्ष्य आहे.”

गुंतवणूकदारांनी काय करावं?

  • Profit आणि Cash Flow दोन्ही मजबूत आहेत.
  • Revenue थोडा कमी आहे, आणि पुढील तिमाहीसाठी soft guidance आहे.
  • पण मोठे deals आणि खर्च नियंत्रणामुळे long term picture चांगली दिसते.

तुम्ही long-term investor असाल, तर Wipro कडे लक्ष ठेवायला हरकत नाही. Short-term मध्ये थोडा दबाव असू शकतो.

Telegram Link

ही पोस्ट वाचा: Gensol Engineering वर SEBI ची कारवाई, गुंतवणूकदारांवर काय परिणाम होऊ शकतो?

Author

  • Marathi Finance म्हणजे मराठी लोकांसाठी आर्थिक माहितीसाठी एक सोपं आणि विश्वासार्ह प्लॅटफॉर्म. आमचं ध्येय अगदी स्पष्ट आहे – गुंतवणूक, बचत, कर्ज, विमा, शेअर बाजार आणि पैशांशी संबंधित इतर महत्त्वाच्या गोष्टींची माहिती अगदी सोप्या भाषेत देणं. आर्थिक गोष्टी समजून घ्या, मजबूत निर्णय घ्या – हाच आमचा हेतू. Marathi Finance च्या माध्यमातून आम्ही मराठी वाचकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि जागरूक बनवण्याचा प्रयत्न करतो.✌

    View all posts

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top