Parag Parikh ELSS Tax Saver Fund Review 2025 in Marathi | इक्विटी-लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम (ELSS) ही भारतातील सर्वात लोकप्रिय टॅक्स-बचत गुंतवणूक पर्यायांपैकी एक आहे. इनकम टॅक्स ॲक्टचा सेक्शन 80C अंतर्गत Tax benefits आणि Long term संपत्ती निर्मितीचे फायदे देणारा Parag Parikh ELSS Tax Saver Fund एक उत्कृष्ट पर्याय आहे. या आर्टिकलमध्ये आपण या फंडची सविस्तर माहिती, फायदे, आणि गुंतवणूक प्रोसेस समजून घेणार आहोत.
ELSS फंड म्हणजे काय?
SEBI नुसार, ELSS फंड मुख्यत्वे ८०% पेक्षा जास्त गुंतवणूक इक्विटी आणि इक्विटी-संबंधित साधनांमध्ये करतो. याला ३ वर्षांचा लॉक-इन पीरियड असतो आणि सेक्शन 80C अंतर्गत करसवलत मिळते. हा फंड टॅक्स बचत आणि इक्विटी मार्केट एक्सपोजर एकत्रितपणे देऊ शकतो.
Parag Parikh ELSS Tax Saver Fund बद्दल माहिती
- सुरूवात झाल्याची तारीख: ४ जुलै, २०१९
- २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत NAV: ₹३१.०५
- किमान SIP गुंतवणूक: ₹१,०००
- कमाल एकमुश्त गुंतवणूक: ₹१,०००
- फंडचा आकार: ₹४,५७२ कोटी
- मुख्य होल्डिंग्ज: HDFC Bank, बजाज होल्डिंग्ज अँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेड. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, कोल इंडिया, ITC, इ.
- Expense Ratio: ०.६३%
- एग्झिट लोड: अजिबात नाही (म्हणजे पैसे काढले की फी नाही)
- फंड मॅनेजर: राजीव ठाक्कर, रौनक ओंकार, राज मेहता, रुकुन ताराचंदानी, मानसी करीया
Parag Parikh ELSS Tax Saver Fund चा रिटर्न
ELSS फंड्सला ३ वर्षे लॉक-इन असतो, पण Long Term परफॉर्मन्स महत्त्वाचा आहे. Parag Parikh ELSS Tax Saver Fund ने खालीलप्रमाणे रिटर्न दिला आहे:
- १ वर्ष: ९.०९%
- ३ वर्ष: १८.४२%
- ५ वर्ष: २३.०९%
Parag Parikh ELSS Tax Saver Fund मध्ये गुंतवणूकीचे फायदे
१. Tax Benefits – ₹१.५ लाख पर्यंतची गुंतवणूक सेक्शन 80C अंतर्गत Tax Benefits घेता येतो.
२. Equity Exposure – लार्ज-कॅप आणि मिड-कॅप शेयर्समध्ये गुंतवणूक करून High Return ची शक्यता वाढते.
३. No Exit Load – ३ वर्षांनंतर एग्झिट लोडशिवाय पैसे रिडीम करता येतात. म्हणजे कोणती फी लावली जात नाही.
४. Long Term संपत्ती निर्मिती – या फंडच्या Value Investing स्टाइलमुले स्थिर रिटर्न मिळतो. Long Term मध्ये संपत्ती बनते.
५. कमी Expense Ratio – फक्त ०.६३% खर्चाचे प्रमाण ELSS श्रेणीत कमी आहे.
६. अनुभवी फंड मॅनेजर – तज्ज्ञ टीमच्या हाताखाली फंड चालविला जातो.
Parag Parikh ELSS Tax Saver Fund मध्ये गुंतवणूक कशी करावी?
१. ऑनलाइन ऍप्सद्वारे: Groww, Zerodha Coin, Asset Plus सारख्या प्लॅटफॉर्मवर SIP किंवा लम्पसम गुंतवणूक करणे एकदम सोप आहे. पण तुम्हाला स्वतला फंड्स निवडावे लागतील.
२. थेट फंड वेबसाइट किंवा APP: PPFAS म्युच्युअल फंडच्या अधिकृत वेबसाइटवर किंवा App वर जावून तुम्ही पैसे गुंतवू शकता.
३. सल्लागारांच्या मदतीने: गुंतवणुकीत नवीन असल्यास, म्युच्युअल फंड सल्लागारांकडून मार्गदर्शन घ्या. उगाच नको तो फंड निवडून नुकसान करून घेण्यापेक्षा हे कधीची बेस्ट. (तुम्ही मला कॉनटॅक्ट करू शकता जर सल्लागार हवा आहे)
Parag Parikh Mutual Fund कंपनीविषयी
PPFAS म्युच्युअल फंडची स्थापना २०१३ मध्ये प्रख्यात गुंतवणूकदार पराग परीख यांनी केली. ग्राहकांना अधिक माहितीसाठी किंवा तक्रारींसाठी अधिकृत वेबसाइट www.ppfas.com वर भेट देता येईल.
तसेच, कस्टमर केअर क्रमांक +९१-२२-६१३२-६१०० किंवा टोल-फ्री क्रमांक 1800-266-7790 वर संपर्क साधता येऊ शकतो. ईमेलद्वारे माहिती मिळवण्यासाठी mf@ppfas.com वर मेल पाठवता येईल, तसेच व्हॉट्सअॅप क्रमांक 91-80109-24178 वरही संपर्क साधता येईल.
PPFAS म्युच्युअल फंडचे कार्यालय 81/82, 8 वा मजला, साखर भवन, रामनाथ गोयंका मार्ग, 230, नरिमन पॉईंट, मुंबई – 400 021, महाराष्ट्र, भारत येथे स्थित आहे
निष्कर्ष
Parag Parikh ELSS Tax Saver Fund हा टॅक्स-सेव्हिंग म्युच्युअल फंड शोधणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी उत्तम पर्याय आहे. विविधीकृत पोर्टफोलिओ, कमी खर्चाचे प्रमाण, आणि सक्षम Management टीम यामुळे हा फंड ELSS श्रेणीत वेगळा ठरतो. मात्र, इक्विटी मार्केटमधील चढ-उतार लक्षात घेऊन दीर्घकालीन दृष्टिकोनातून गुंतवणूक करावी.