Mutual Funds मधून रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी १२% रिटर्न्सची अपेक्षा ठेवू शकतो का?

Mutual Funds for Retirement Planning | रिटायरमेंट किंवा कोणत्याही लाँग टर्म आर्थिक उद्दिष्टांसाठी योजना करताना, अनेक लोक SIPs च्या मदतीने Mutual Funds मध्ये गुंतवणूक करतात.

बर्‍याच वेळा 12% वार्षिक रिटर्न अपेक्षित धरला जातो, कारण भारतातील Equity Mutual Funds ने इतिहासात लाँग टर्ममध्ये असे रिटर्न्स दिले आहेत.

आणि खरं सांगायचं तर, गणित करताना 12% रिटर्न गृहीत धरणं योग्यच आहे. त्यापेक्षा जास्त रिटर्न मिळाला, तर बोनस समजा!

पण खरोखर 12% रिटर्न मिळू शकतो का?

Mutual Funds चा Past Performance कसा आहे?

Association of Mutual Funds in India (AMFI) च्या 10 मार्च 2025 च्या data नुसार, अनेक mutual funds ने चांगले returns दिले आहेत:

Category10 वर्षांत 12% पेक्षा जास्त Returns देणाऱ्या Schemes
Large Cap Funds24 पैकी 8 Schemes
Small Cap Funds13 पैकी 13 Schemes
Mid Cap Funds20 पैकी 20 Schemes
Flexi Cap Funds18 पैकी 12 Schemes
ELSS Funds28 पैकी 17 Schemes

अलीकडच्या market correction नंतरही, अनेक Large Cap Funds ने मागील दहा वर्षांत 11-12% returns manage केले आहेत.

तर Small Cap Funds आणि Mid Cap Funds मध्ये 100% strike rate दिसला आहे, जिथे सर्व schemes ने 12% पेक्षा जास्त returns दिले आहेत.

12% Returns ची अपेक्षा ठेवणे योग्य आहे का?

MIRA Money चे co-founder Anand K Rathi यांच्या मते, Equity SIPs मधून 12% returns ची अपेक्षा ठेवणे योग्य आहे. ते याचे सोपे कारण सांगतात:

  • भारताची 2025-26 साठी अपेक्षित nominal GDP growth 10.1% आहे.
  • चांगल्या management असलेल्या कंपन्या, विशेषत: Large Cap कंपन्या, अतिरिक्त 2-3% growth करू शकतात.
  • यामुळे एकूण growth सुमारे 12-13% पर्यंत पोहोचू शकतो.

तथापि, share market च्या चढ-उतारामुळे ही growth थोडी कमी होऊ शकते पण Long Term मध्ये 12% returns ही retirement planning साठी एक योग्य अपेक्षा ठरू शकते.

Mutual Funds for Retirement Planning

रिस्क घेणार तर Mutual Fund त्यानुसार Return देणार

Mutual Funds मधून मिळणारे returns तुमच्या risk profile वर अवलंबून असतात:

  • Conservative Investors: साधारण 7-8% returns मिळू शकतात.
  • Moderate Risk Investors: सुमारे 9-10% returns मिळू शकतात.
  • High-Risk Investors: 11-12% पर्यंत potential returns मिळू शकतात.

तर मग Mutual Fund मध्ये गुंतवणूक करताय ना?

जरी 12% returns मिळू शकतात, तरी ते guaranteed नाहीत. (म्हणून मी सतत तुम्हाला long term, long term बोलत असतो)

तुमची Mutual Fund investments आणि SIPs तुमच्या financial goals आणि risk tolerance शी जुळली पाहिजे.

हे लक्षात ठेवा की market conditions आणि तुमचे investment choices तुमच्या एकूण returns मध्ये मोठी भूमिका बजावतात.

Social Media Links

Author

  • Marathi Finance म्हणजे मराठी लोकांसाठी आर्थिक माहितीसाठी एक सोपं आणि विश्वासार्ह प्लॅटफॉर्म. आमचं ध्येय अगदी स्पष्ट आहे – गुंतवणूक, बचत, कर्ज, विमा, शेअर बाजार आणि पैशांशी संबंधित इतर महत्त्वाच्या गोष्टींची माहिती अगदी सोप्या भाषेत देणं. आर्थिक गोष्टी समजून घ्या, मजबूत निर्णय घ्या – हाच आमचा हेतू. Marathi Finance च्या माध्यमातून आम्ही मराठी वाचकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि जागरूक बनवण्याचा प्रयत्न करतो.✌

    View all posts

Leave a Comment